Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News : सांगलीत शाळकरी मुले नशेच्या आहारी; सार्वजनिक उद्यानात खुलेआम नशा

Sangli : सांगली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणच्या एका उद्यानात भर गर्दीत सात ते आठ मुले वेप हुक्का ओढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शाळकरी मुले देखील नशेच्या आहारी जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले

विजय पाटील

सांगली : रस्त्यावर अनेक लहान मुले नशा करताना नजरेस पडत आहेत. अशात सांगली शहरात शाळकरी मुलांकडून सार्वजनिक उद्यानात खुलेआम नशा केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही पालकांनीच शाळकरी मुले सार्वजनिक उद्यानात नशा करत असल्याचे चित्रीकरण करत हा प्रकार उघडकीस आणला आहे. हा प्रकार समोर आल्याने जणू काही शहरात नशेचा बाजार मांडला गेला असल्याचे बोलले जात आहे. 

आजघडीला नशा करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अगदी मोठ्यांपासून ते महाविद्यालयीन मुलांसह शाळकरी मुले देखील नशा करत असल्याचे समोर आले आहे. यात सांगली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणच्या एका उद्यानात भर गर्दीत सात ते आठ मुले गोल करून वेप हुक्का ओढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शाळकरी मुले देखील नशेच्या आहारी जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. 

उद्यानातच नशेचा बाजार 

शाळकरी विद्यार्थी नशा करण्यासाठी थेट शहरातील उद्यानांमध्ये येत आहेत. एका ठिकाणी बसून सात ते आठ जण नशा करत गोंधळ घालताना दिसत आहेत. अर्थात ज्याठिकाणी नागरिक थोडी शांतता किंवा विरंगुळा करण्यासाठी येत असतात. त्याच ठिकाणी नशेचा बाजार सुरु असल्याने नागरिकांनी आता जायचे कोठे असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. 

पोलिसांनी पहारा ठेवण्याची मागणी 

नागरिकांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण असलेल्या बागा, उद्याना व नदीकाठच्या घाटापर्यंत पोलिस पहारा ठेवावा; अशी मागणी पृथ्वीराज पवार यांनी केली आहे. तसेच उद्यानांमध्ये चाललेल्या या प्रकारावर अंकुश ठेवण्यासह शाळकरी मुलांकडे नशेच्या या वस्तू येतात कशा? याचा शोध आता घ्यावा अशीही मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT