Sangli Flood Saam TV
महाराष्ट्र

Sangli Flood Update: सांगलीकरांना दिलासा! कृष्णा नदीची पाणी पातळी ३९ फुटांवर स्थिर, कोयनेतून पाण्याचा विसर्ग सुरूच

Sangli Rain And Flood Update: सांगलीमध्ये मुसळधार पावसानंतर आलेल्या पूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. पण आता कृष्णा नदीची पाणी पातळी स्थिर झाल्यामुळे सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे.

Priya More

सांगलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने (Sangli Rainfall) धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सांगीलीमधील जनजीवन विस्कळीत झाले होते. पण आता सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे. कारण कृष्णा नदीची पाणी पातळी ३९ फुटांवर स्थिर झाली आहे. पण कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. पूरस्थितीमुळे लष्कराचे जवान आणि एनडीआरएफची टीम सांगलीमध्ये आली आहे. जवानांनी कृष्णा नदीच्या (Krishna River) पाणी पातळीची पाहणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी ३९ फुटांवर स्थिर झाली आहे. गेल्या २४ तासांत दीड फुटाने पाण्याची पातळी कमी झाली आहे. कृष्णाची पातळी ४० फूट ६ इंच होती. कृष्णाची पाणी पाचळी इशारा पातळी वर होती. मात्र आता दीड फुटाने पाणी पातळी कमी होऊन ती ३९ फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे सांगलीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पण कोयना आणि वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरूच आहे. या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.

सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी ३९ फुटांवर स्थिरावली आहे. इशारा पातळीच्या एक फुटाने खाली पाण्याची पातळी गेल्याने सांगलीकरांना काहीसा दिलासा मिळाला.या कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी पाहण्यासाठी लष्कराचे जवान नदीकाठी आले होते. त्यांनी नदीची पाहणी केली आणि ते निघून गेले.

दरम्यान, कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण ४ हजार ६२ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते. त्याचसोबत जनावरांचे देखील स्थलांतर करण्यात आले होते. या पुरामुळे कृष्णा आणि वारणा नदीकाठची हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. यामध्ये भात, सोयाबीन, ऊस आणि भाजीपाला अशी पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अनेक लोकांना माझ्या भाषणाने मिरची लागली - देवेंद्र फडणवीस

BSNL Satellite Phone : iPhone पेक्षाही महाग BSNL चा सॅटेलाइट फोन! नेटवर्कशिवायही करता येणार कॉल

Crispy Corn Bhaji: पावसाळ्यात चहासोबत बनवा खमंग क्रिस्पी कॉर्न भजी; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळणे, कोंडा आणि चिकटपणा टाळायचा? मग घरीच घ्या केसांची अशी काळजी

Steel Tea Strainer: घाणेरडी काळी झालेली चहाची गाळणी मिनिटांत चमकेल! फक्त वापरा 'हा' १ सोपा घरगुती उपाय; दिसेल जादू

SCROLL FOR NEXT