Sangli Sadhu News Saam TV
महाराष्ट्र

Sangli: साधूंना मारहाण प्रकरणाचा Video व्हायरल; न्याय देण्याची भाजपची भूमिका

'वर्तमान सरकार साधू संताचे रक्षण करणारे असून या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करणार.'

Jagdish Patil

सांगली: उत्तर प्रदेशमधील चार साधूंना मुले चोरणारी टोळी समजून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीच्या (Sangli) जत तालुक्यातल्या लवंगा येथे ही घटना घडली आहे. कर्नाटकमधून जत मार्गे पंढरपूरकडे देवदर्शनासाठी जाताना या चार साधूंना मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल झाला आहे. या प्रकरणी साधूंनी उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) मथुरा येथील ४ साधू देवदर्शनाच्या निमित्ताने कर्नाटकमधील विजापूर या ठिकाणी आले होते. कर्नाटकमधील देवदर्शन संपल्यानंतर हे साधू पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले असताना जत तालुक्यातील लवंगा गावात साधू पोहोचले.

पुढील रस्त्याची माहिती नसल्याकारणाने या साधूंनी एका शाळकरी मुलाला रस्त्याबाबत विचारणा केली. त्यावेळी त्या ठिकाणी असणाऱ्या काही ग्रामस्थांना गाडीतून आलेले साधू मुले चोरणारी टोळी असल्याचा संशय आला. त्यामुळे या ग्रामस्थांनी चारही साधूंना गाडीतून बाहेर ओढत जबर मारहण केली आहे.

साधूंना मारहाण झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चारही साधूंना पोलीस ठाण्यामध्ये त्यांची चौकशी केली असता. साधूंकडे त्यांचे आधार कार्ड मिळाले शिवाय त्यांनी दिलेल्या फोन नंबरवरती संपर्क साधला असता ते मथुरा येथीलच खरे साधू असल्याचा समोर आले आहे. हे सर्व श्री पंचनाम जुना आखाडा येथील साधू असल्याचं स्पष्ट झाले, त्यामुळे ही मुले चोरी करणारी टोळी नसल्याचे स्पष्ट झालं आहे.

दरम्यान साधूंना मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आता या प्रकरणाची गंभीर दखल भाजप आमदार राम कदम यांनी घेतली आहे. कदम यांनी सांगलीमध्ये साधूंना झालेल्या या मारहाणीचा निषेध केला आहे. शिवाय यावेळी त्यांनी या घटनेला पालघर साधुंच्या हत्याकांडाशी जोडत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. सध्याचे सरकार साधू-संताचे रक्षण करणारे असून या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे -सातारा महामार्गावर कंटेनरने ५ वाहनांना दिली धडक, ५ जण जखमी

Thane Crime: डिलिव्हरी बॉयला ड्रग्ज विकताना अटक, ४ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त

UPSC Recruitment: सरकारी नोकरीची संधी; UPSC ने जारी केली भरती; अर्ज कसा करावा?

Dhananjay Mundhe : दारू पिऊन सुसाट चालवली गाडी, धनंजय मुंडेंच्या समर्थकाचा प्रताप; VIDEO व्हायरल

Pune Rave Party Case : खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, खेवलकरांची उच्च न्यायालयात धाव, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT