Dipak Kesarkar Saam tv
महाराष्ट्र

Dipak Kesarkar News : मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आम्ही बनवणार; मंत्री दीपक केसरकर यांचा दावा

विजय पाटील

सांगली : मुंबईवर २५ वर्षे ज्यांनी राज्य केले. त्यांना चांगले रस्ते, आरोग्य देणे सुचले नाही. ते काम आता (Sangli) मुख्यमंत्री करत आहेत. मुंबईचे प्रदूषण, पाणी वापरून थांबवले आहे. आता मुंबई शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आम्ही बनवणार असल्याचा दावा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी केला आहे. (Latest Marathi News)

मंत्री दीपक केसरकर यांनी आज सांगली येथे माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टिकेवरुन टोला लगवाला आहे. मुंबई आजही झोपडपट्ट्याच्या विळख्यात तशीचं आहे. हा विळखा काढताना मुंबईतील लोक राजकारण करत आहेत. कदाचित त्यांना परिस्थिती माहिती नसले त्यामुळे त्या बोलत असतील, पण आम्ही त्यांचा आदर करतो.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुप्रिया सुळे यांना काय वाटतं याच्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही. सुप्रिया सुळेंचे कार्यक्षेत्र बारामती आहे. शरद पवारांनी बारामतीचा विकास करून त्यांना दिला आहे. त्यामुळे त्याचा विकास करावा. अनिल बाबर यांना मंत्रीपद मिळणार यावर बोलताना मंत्रीमंडळ विस्तर लांबला आहे. पण एका नावासाठी आम्ही आग्रह धरणार आहे; ते म्हणजे अनिल बाबर यांच्या नावाचा. मुख्यमंत्री यांनी जाहीर केल्याप्रमाणे लवकरच मंत्रीमंडळ विस्तरा होईल; असेही केसरकर यांनी सांगितले. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: ब्रेकिंग! जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात; ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

SCROLL FOR NEXT