Sangli News NCP
Sangli News NCP Saam tv
महाराष्ट्र

Sangli News: पुष्‍पहार अर्पण करून गॅसला श्रद्धांजली; केंद्र सरकार विरोधात राष्ट्रवादी महिला आघाडीचे बोंबाबोब आंदोलन

विजय पाटील

सांगली : मिरजेत गॅस दर आणि महागाई वाढ करणाऱ्या केंद्र शासनाच्या विरोधात (NCP) राष्ट्रवादी महिला आघाडीचे बोंबाबोब आंदोलन करण्यात आले. जागतिक महिला दिन साजरा करताना केंद्र सरकारने गॅस (Gas) दरवाढ करून महिलांच्या डोळ्यात पाणी आणणारा केन्द्र शासनाने निर्णय घेतला आहे. या गॅस दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात संताप व्यक्त करत राष्ट्रवादी नगर सेविका संगीता हारगे यांच्या नेतृत्वाखाली बोंबाबोब आंदोलन करण्यात आले. (Live Marathi News)

राष्‍ट्रवादी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मोकळ्या गॅसला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली आणि चुलीवर स्वयंपाक करून केंद्र शासनाच्या विरोधात बोंब मारून निषेध व्यक्त करण्यात आला. एकेकाळी 400 ते 500 रुपये गॅस दर असताना गॅस दरवाढ केल्यानंतर स्मृति इराणी या रस्त्यांवर उतरल्या होत्या. आज 1100 रुपयेवर गॅस सिलेंडर (Sangli News) किंमत गेली आहे. आता स्मृती ईराणी कुठे गेल्या असा संतप्त सवाल राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा राधिका हारगे यांनी केला.

आगामी निवडणुकीमध्ये भाजप सरकारला घरी बसवण्याचे आव्हान नगरसेविका संगीता हारगे यांनी केले आहे. तातडीने गॅस व इतर जीवनावश्यक वस्तूंची दर कमी करावेत. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल; असा इशारा देखील देण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nasim Khan News : कॉंग्रेसचं नाराजीनाट्य शमलं! नसीम खान यांच्या खांद्यावर नवीन जबाबदारी..

Shriniwas Pawar News : तर अजित पवारांनी आताच मिशी काढावी, बंधू श्रीनिवास यांची प्रतिक्रिया

Beed News : एटीएम मशीनच नेले चोरून; अंबाजोगाई शहरातील मध्यरात्रीची घटना

Viral Video: क्रुरतेचा कळस! पत्नीने पतीला साखळीने बांधलं; घरात कोंडून केली मारहाण... धक्कादायक VIDEO

LSG vs KKR: KKR कडून पराभवाचा बदला घेण्यासाठी लखनऊचा संघ उतरणार मैदानात! अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

SCROLL FOR NEXT