Sangli Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Sangli Vidhan Sabha : सांगलीत काँग्रेससमोर उमेदवारीचा पेच; जयश्री पाटील उमेदवारीवर ठाम!

Sangli News : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर इच्छुक उमेदवारांची जोरदार तयारी सुरु झाली आहे.

विजय पाटील

सांगली : सांगली विधानसभेसाठी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यात माजी मंत्री स्व. मदन पाटील यांच्या पत्नी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक उपाध्यक्ष जयश्री पाटील या मागे हटण्यास तयार नाहीत. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या उमेदवारीबाबत पेच निर्माण झाला आहे. 

विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election) बिगुल वाजल्यानंतर इच्छुक उमेदवारांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. दरम्यान पक्षांकडून देखील चाचपणी करत उमेदवारांचे नाव निश्चित करण्यावर काम सुरु आहे. दरम्यान (sangli) सांगली विधानसभेसाठी उमेदवार निवडीवरून काँग्रेससमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. उमेदवारीबाबत खासदार विशाल पाटील यांच्या घरी विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीमध्ये जयश्री पाटील गटाकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.  

जवळपास जयश्री पाटील यांचे नाव निश्चित 

दरम्यान खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांच्याकडूनही जयश्री पाटील यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल देण्यात आल्याचे मदन पाटील गटाच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे जयश्री पाटील यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता पाटील गटाकडून व्यक्त करण्यात येत आहे. वसंतदादा घराण्याच्या सून आणि महापालिका क्षेत्रातील मदन पाटील गट त्याच बरोबर खासदार विशाल पाटील यांचा पाठिंबा, शिवाय विश्वजित कदम यांच्या जवळच्या नातेवाईक यामुळे जयश्री पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे पृथ्वीराज पाटलांच्या उमेदवारीचा पत्ता कट होण्याची चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : अकलूज मध्ये फेर मतदान घेण्याची मागणी

Maharashtra Politics: मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी टाकला डाव, एकनाथ शिंदेंना धक्का; बड्या नेत्यानं हाती घेतली मशाल

Maharashtra Politics : हायकोर्टाचा निर्णय, मतमोजणी लांबणीवर; मुख्यमंत्र्यांकडूनही आयोगावर हल्लाबोल

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात ७० वर्षीय महिलेचा मृत्यू

Skin Care: १० रुपयांच्या व्हॅसलीनने होतात हे फायदे; महागड्या केमिकल क्रिमची कधीच लागणार नाही गरज

SCROLL FOR NEXT