Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News: लाखात एक घोडा..कारपेक्षाही जास्त किंमत; रोजच्‍या खुराकात दूध, तूप अन्‌ बरेच काही

Price of Horse: लाखात एक घोडा..कारपेक्षाही जास्त किंमत; रोजच्‍या खुराकात दूध, तूप अन्‌ बरेच काही

विजय पाटील

सांगली : लाखात एक घोडा अन्‌ तोही कारपेक्षाही जास्त किंमतीचा घोडा.. या घोड्याला पैलावानाप्रमाणे खुराकाची काळजी घेतली जाते. छंद जोपासणे ही गोष्ट सोपी दिसत असली तरी त्यासाठी खूप मेहनत ही घ्यावी लागते. (Sangli) सांगलीतील मुजावर बंधूंनाही घोडे पााळण्याचा अनोखा छंद आहे. (Breaking Marathi News)

महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात घोडे सांभाळण्याचा छंद मोठ्या प्रमाणात केला जातो. पण हा छंद सोपा नाही. त्यासाठी मोठ्या कष्टाची गरज आहे. त्याच पद्धतीने मुजावर बंधू घोडे सांभाळत आहेत. सांगलीतील मुजावर बंधू त्यांच्या घोड्यांवरील प्रेमासाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. दिवगंत शौकत मुजावर यांनी सर्वप्रथम घोडे पालनाचा छंद सुरू केला. त्यानंतर त्यांची मुले सलीम शौकत मुजावर आणि जावेद शौकत मुजावर यांनी ही परंपरा जोपासली आहे.

पैलवानाप्रमाणे खुराकाची काळजी

मुजावर बंधूंकडे सर्वात प्रतिष्ठित मानली जाणारी मारवाडी, सिंध काटेवडी आणि पंजाबी या जातीचे घोडे त्यांच्याकडे आहेत. या घोड्यांची किंमत ऐकली तर डोळे पांढरे होतील. प्रत्येक घोड्याची किंमत ही पाच ते सहा लाखांच्या घरात आहे. एखाद्या पैलवानाप्रमाणे त्याच्या खुराकाची काळजी घेतली जाते. त्यांच्या आहारात दररोज दूध, तूप, गहू, चना आदी खाद्यांचा समावेश आहे. त्याचा सांभाळ देखील खूप महत्त्वाचा आहे.

लग्‍न वरातीत मोठी मागणी

या घोड्यांना प्रदर्शन तसंच लग्न (Marriage) समारंभात मोठी मागणी असते. लग्नाच्या वरातीत घोड्यावर स्वार होऊन येण्याचा नवरदेवाचा मान असतो. त्यामुळे हजारो रुपयांचे भाडे घेतले जाते. मध्यंतरी कोरोनाच्या काळात घोड्यांच्या व्यवसायावर मोठे संकट आले होते. लग्न समारंभाला असलेली बंधने, वरातीला बंदी यामुळे घोडा व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. वेळप्रसंगी पदरमोड करून हजारो रुपयांचा खुराक या घोड्यांना द्यावा लागत होता. आता दोन वर्षानी निर्बंध हटल्यानंतर आता हा व्यवसाय पूर्वपदावर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शरद पवारांना मोठा धक्का; पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचा राजीनामा

Skin Care: थंडीत चेहरा काळा पडतोय? घरातला फक्त एक पदार्थ वापरा, चेहरा हिऱ्यासारखा चमकेल, गाल होतील मऊ-मऊ

Maharashtra Live News Update: प्रशांत जगताप यांचा राष्ट्रवादीचा राजीनामा

New Year Special: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घराच्या घरी बनवा टेस्टी प्लम केक

Rubaab Teaser: तुझ्यासारखी नको तूच पाहिजे...,लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार एक रुबाबदार लव्हस्टोरी

SCROLL FOR NEXT