Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Sangli News : चांदोली परिसरातील क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळै डोंगरमाथ्यावरुन धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने चांदोली धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे

विजय पाटील

सांगली : राज्यातील अनेक भागात दमदार पावसाला सुरवात झाली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत असून चांदोली पाणलोट क्षेत्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे वारणा धरणातून १३ हजार ५०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर कृष्णा नदीची पातळी तब्बल १९ फुटावर पोहचली आहे. वारणेच पाणी पात्रा बाहेर जात असल्याने नदी काठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

सांगलीच्या चांदोली परिसरातील क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळै डोंगरमाथ्यावरुन धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने चांदोली धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या चारही वक्राकार दरवाज्यातून वारणा नदीपात्रात सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग आज सकाळी परत वाढविण्यात आला आहे. 

शेतांमध्येही शिरले पाणी 

सध्या धरणाच्या चारही वक्राकार दरवाज्यातून ११ हजार ९०० क्युसेक्स तर वीज १६३० असा एकूण १३ हजार ५३० क्युसेक विसर्ग वारणा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून नदीकाठच्या ऊस व भात पिकामध्ये देखील पाणी शिरले आहे. त्यामुळे चांदोली धरण प्रशासनाकडून नदीकाठच्या गावातील नागरीकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी सकाळी सहावाजेपर्यंत २४ तासात ५४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. 

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ 
तर वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वारणा नदीचे पाणी पात्रा बाहेर पडले आहे. शेतामध्ये पाणी शिरले आहे. यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वारणा नदीप्रमाणे सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी देखील १९ फुटावर गेली आहे. गेल्या दोन दिवसात कृष्णाच्या पातळीमध्ये वाढ होत आहे. असाच पाऊस सुरु राहिल्यास पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Maharashtra News Live Update: पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

Famous Singer : प्रसिद्ध गायकावर हल्ला; थेट गाडीवरच गोळीबार, संगीत विश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT