Sangli News Gas
Sangli News Gas Saam tv
महाराष्ट्र

Sangli News: गॅस सिलेंडरची अंत्‍ययात्रा; स्‍मशानभुमीत अंत्यसंस्कार करत केले सर्व विधी

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : सांगलीत गॅस दरवाढीच्या निषेधार्थ आज मदनभाऊ पाटील युवा मंचाने अनोखे आंदोलन करत सर्वांच लक्ष वेधले. गॅस (Gas) सिलेंडरची प्रतिकात्‍मक अंत्‍ययात्रा काढून अंत्‍यविधी करत (Sangli News) केंद्र सरकारचा निषेध केला. (Live Marathi News)

वाढत्या गॅस सिलेंडरच्या दराने सर्वसामान्य नागरिक हैराण झालेले आहेत आणि याच महागाईकडे लक्षवेधण्यासाठी मदन भाऊ पाटील युवा मंचाने सांगलीमध्ये चक्क गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा काढत गॅस सिलेंडरवर अंत्यविधी सुद्धा पार पाडला. या प्रतीकात्मक आंदोलनामुळे मात्र या आंदोलनाची सांगलीमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. सांगलीच्या अमरधाम स्मशानभूमीमध्ये गॅस सिलेंडरच्या प्रतिकृतीचे दहन करत अंत्यसंस्कार करण्यात आले.

स्‍मशानभुमीत सर्व धार्मिक प्रक्रीया पुर्ण

यावेळी माती सावरण्याचा कार्यक्रम त्याच ठिकाणी कार्यकर्त्यांनी उरकून घेत अंत्यविधीच्या सर्वच धार्मिक प्रक्रिया पूर्ण केल्या. मदन भाऊ पाटील युवा मंचाचे अध्यक्ष आनंद लेंगरे व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हे अनोखे आंदोलन करत महागाई कडे सरकारचं लक्ष वेधले. यावेळी महिलांनी सुद्धा आंदोलनात सहभाग घेत सरकारच्या विरोधात शंखध्वनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar 2024: शुक्राच्या राशी बदलामुळे 'या' ३ राशी होणार धनवान

Pune News: आईच्या कुशीतून चोरलेलं ७ महिन्याचं बाळ सापडलं; पुणे पोलिसांनी २४ तासांतच आरोपीला शोधलं

Fruit Diet: उपाशी पोटी खा फळे, आरोग्य सुधारेल

Gangapur Dam : नाशिककरांसाठी आनंदाची बातमी; गंगापूर धरणाची क्षमता २ कोटी १५ लाख लिटरने वाढली

Today's Marathi News Live : विजय शिवतारे अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT