Sangli News
Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News: तोतया नौदल अधिकाऱ्याचा कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न

विजय पाटील

सांगली : सांगलीच्या आष्टा पोलिस ठाण्यात अटकेत असलेल्या फसवणुकीतील तोतया नौदल अधिकाऱ्याने रविवारी सायंकाळी कोठडीतच (Sangli) गळफास घेऊन तसेच हाताची नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा प्रयत्न अपयशी ठरला. (Maharashtra News)

आकाश काशिनाथ डांगे (वय २९ रा. पाडळी ता. फलटण) असे त्या संशयिताचे नाव आहे. दरम्यान, डांगे याला तातडीने सांगलीतील शासकीय रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. नौदलात नोकरी लावण्याच्या आमिषाने बहादूरवाडीच्या सहा जणांची तब्बल ३० लाखांची फसवणूक (Fraud) केली होती. भारतीय नौदलात भरती करतो, असे सांगून युवकांची फसवणूक करणारा आकाश डांगे सध्या आष्टा पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्यावर विविध ठिकाणी आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी दाखल होत आहेत.

दोरी तुटल्‍यानंतर नस कापण्याचा प्रयत्‍न

आष्टा पोलिसांनी डांगे याचा शोध घेऊन त्याला पुण्यातून ताब्यात घेत अटक केली होती. त्याला न्यायालयापुढे उभे केले असता पाच दिवसांची कोठडी सुनावली होती. या दरम्‍यान सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोलिस कोठडीत असतानाच कोणाचे लक्ष नसल्याचे पाहून त्याने दोरीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी दोरी तुटल्याने तो खाली पडला. तर पुन्हा त्याने हाताची नस कशानेतरी कापण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अपयशी ठरला. यावेळी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास सदरची बाब येताच त्यांनी तातडीने सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : लग्नाचे आमिष दाखवून 17 वर्षीय मुलीला नेले पळवून, वैद्यकीय तपासणीनंतर कुटुंबाला बसला धक्का

Loksabha Election: ब्रेकिंग! सूरत, इंदुरनंतर काँग्रेसला आणखी एक धक्का; लोकसभा उमेदवाराची निवडणुकीतून माघार

Vishal Pawar Case Update | विशाल पवार मृत्यूप्रकरणाला नवं वळण

Kolhapur Jail News: कैद्यांपर्यंत कोण पोहोचवतंय मोबाईल फोन? कोल्हापूर जेलमधून आणखी 10 मोबाईल जप्त!

Kalyan Lok Sabha: कल्याणमध्ये नवा ट्विस्ट! रमेश जाधव यांच्या उमेदवारीमागे ठाकरेंची राजकीय खेळी की आणखी काही?

SCROLL FOR NEXT