Sangli Jail Saam tv
महाराष्ट्र

Sangli Jail : कारागृहाच्या तटबंदीवरील तारांमध्ये आता विजेचा प्रवाह; स्पर्श होताच वाजणार ‘अलार्म’

Sangli News : ब्रिटिशकालीन असलेल्या सांगली जिल्हा कारागृहाच्या तटबंदीवरून कैदी पळाल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे सांगलीच्या कारागृहाची सुरक्षा पुन्हा ऐरणीवर आली

विजय पाटील

सांगली : सांगली जिल्हा कारागृहाच्या तटबंदीवर उभारलेल्या सहा फुटांच्या तारेच्या ‘वाय’ आकारातील (Sangli) कम्पाउंडच्या तारांमधून विजेचा प्रवाह खेळता ठेवला आहे. याला स्पर्श झाल्यास ‘अलार्म सिस्टीम’मधून भोंगा वाजणार आहे. त्यामुळे आता कैद्याने पलायनाचा प्रयत्न केल्यास त्याला करंट लागू शकतो. (Breaking Marathi News)

ब्रिटिशकालीन असलेल्या सांगली जिल्हा कारागृहाच्या तटबंदीवरून कैदी पळाल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे सांगलीच्या कारागृहाची (Jail) सुरक्षा पुन्हा ऐरणीवर आली. गतवर्षी जुलै २०२२ मध्ये तासगावच्या खुनातील संशयित सुनील ज्ञानेश्वर राठोड हा तटबंदीवरून उडी मारून पळाला. तर गेल्या महिन्यात ‘पोक्सो’च्या गुन्ह्यातील सदाशिव अशोक सनदे हा पटवर्धन हायस्कूलच्या बाजूने पळाला. त्यामुळे कारागृहाची सुरक्षा धोक्यात असल्याचा इशारा मिळाला. या घटनेपूर्वी गांजा, दारू, मोबाइल तटबंदीवरून आतमध्ये टाकण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कारागृहाभोवती गेल्या काही वर्षात शाळा, अपार्टमेंट व नागरी वस्ती झाली आहे. नागरिकांच्या घरावर चढून आतमध्ये मटणाची पाकिटे टाकल्याचा प्रकारही पूर्वी घडला होता. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. तटबंदीवर जवळपास सहा फुटांचे तारेचे कम्पाउंड असून, त्यामध्ये विजेचा प्रवाह सोडला आहे तसेच आतमध्ये धोक्याच्या ठिकाणी पत्रे मारले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MP Disqualification: आता सुप्रीम कोर्टात लागणार बंडखोर खासदारांचा निकाल; २० खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

Chandrapur Firing: न्यायालयासमोरच गोळीबार! नाराळपाणी दुकानावर उभ्या असलेल्या तरुणावर धाडधाड झाडल्या गोळ्या

साखरेचे दर शंभरी पार जाणार? ऐन सणासुदीत साखर क़डू

नागपूरमध्ये क्लोरीन वायूची गळती, 40 जणांवर उपचार, 5 गंभीर, जलशुद्धीकरण प्रकल्प भरवस्तीत कसा?

कचोरी आणि बिर्याणीत उंदरांच्या लेंड्या, किळसवाण्या प्रकारामुळे नागरिकांचा संताप

SCROLL FOR NEXT