Chandoli Dam Saam tv
महाराष्ट्र

Chandoli Dam : अतिवृष्टीने चांदोली धरण ९१ टक्के भरले; वारणा नदीत साडेसहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

Sangli News : राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस होत असून सांगली जिल्ह्यात आठवडाभरापासून जोरदार पाऊस सुरु असल्याने चांदोली धरणातील पाणी पातळीत वाढ झाली असल्याने वारणा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

विजय पाटील

सांगली : सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाली आहे. गेल्या २४ तासात ८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून चांदोली धरण ९१.८० टक्के भरले आहे. त्यामुळे चांदोली धरणातून वारणा नदी पात्रात साडेसहा हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिणामी वारणा नदी देखील दुथडी भरून वाहत आहे. 

सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे नदी- नाल्यांना पूर आले आहेत. दरम्यान सांगली जिल्ह्यात देखील पावसाचा जोर कायम आहे. तर गेल्या आठवड्यापासून चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. पावसामुळे ३४.४० टीएमसी क्षमता असणाऱ्या धरणात आता ३१.५८ टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झाल्याने प्रशासनाकडून धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. 

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

दरम्यान चांदोली धरणातून वारणा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यास सुरवात करण्यात आली आहे. दरम्यान आणखी पावसाची शक्यता असल्याने नदीतील विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे. पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

खडकपूर्णा धरणाचे नऊ दरवाजे उघडले
बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या संत चोखामेळा खडकपुर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होत असल्याने प्रकल्पात पाण्याची मोठी आवक झाली आहे. यामुळे प्रकल्पाच्या नऊ दरवाज्यातून मोठ्या प्रमाणात खडकपूर्णा नदीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे. प्रशासनाने नदीकाठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT