Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli : इस्लामपूरमध्ये भाजप कार्यकर्ते व पोलिसांमध्ये झटापट; महिला कार्यकर्त्यांकडून अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

Sangli News : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रित्या अवैध धंदे सुरु आहेत. हे अवैध धंदे रोखण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र पोलीस या प्रकरणी कारवाई करत नसल्याचा आरोप

विजय पाटील

सांगली : सांगलीच्या इस्लामपूरमध्ये पोलीस निरीक्षकाच्या विरोधात भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलन दरम्यान भाजपच्या महिला कार्यकर्त्यांकडून अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा प्रकार रोखण्यासाठी गेलेले पोलिस आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचा देखील घडला आहे. यामुळे आंदोलनस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रित्या अवैध धंदे सुरु आहेत. हे अवैध धंदे रोखण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र पोलीस या प्रकरणी कारवाई करत नसल्याचा आरोप करत भाजपाचे नेते विक्रम पाटील यांनी इस्लामपूर ठाण्याचे पोलीस निरीक्षकांची बदली करावी, अशी मागणी करण्यात आली होती. यासाठी भाजपकडून आंदोलन पुकारण्यात आले होते. 

महिलांनी अंगावर ओतले डिझेल 

मागणी केल्यानंतर देखील इस्लामपूरमध्ये अवैध धंदे सुरूच असल्याचा आरोप करीत आज इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलना सुरवात केली होती. यावेळी आक्रमक झालेल्या भाजपा महिला आघाडीच्या आशा पवार यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. 

पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने झाली झटापट 

आंदोलन करणाऱ्या महिलांनी अंगावर डिझेल ओतल्याने आंदोलनस्थळी एकच खळबळ उडाली होती. त्यांना रोखण्यासाठी पोलीस गेले असता भाजपा कार्यकर्ते व पोलिसांमध्ये वादावादी व झटापटीचा प्रकार घडला आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली. यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  तातडीने इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हरगुडे यांची बदली करावी, अशी मागणी यावेळी इस्लामपूर भाजपाच्यावतीने करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT