Sangli DCC Bank Saam tv
महाराष्ट्र

Sangli DCC Bank : पाच सूतगिरण्यांची मालमत्ता विक्रीसाठी मागविल्या निविदा; थकित कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेची कारवाई

Sangli News : सांगली जिल्हा बँकेकडून जिल्ह्यातील सूतगिरण्यांनी कर्ज उचलले होते. मात्र सदरचे कर्ज फेडण्यात सूतगिरण्या असमर्थ राहिल्या असून त्यांच्याकडे थकीत कर्जाची रक्कम कोट्यवधींच्या घरात आहे

विजय पाटील

सांगली : सांगली जिल्ह्यातील पाच सूतगिरण्यांवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकित कर्ज वसुलीसाठी पुन्हा कारवाईचा बडगा उगारला आहे. या सूतगिरण्यांची मालमत्ता विक्री करण्यासाठी बॅँकेने २० फेब्रुवारीपर्यंत निविदा मागवल्या असून २४ रोजी निविदा उघडण्यात येतील. या सूतगिरण्यांकडे तब्बल १३४ कोटी ४२ लाख रुपयांची मुद्दल असून त्यावरील व्याज वेगळे आहे.

सांगली जिल्हा बँकेकडून जिल्ह्यातील सूतगिरण्यांनी कर्ज उचलले होते. मात्र सदरचे कर्ज फेडण्यात सूतगिरण्या असमर्थ राहिल्या असून त्यांच्याकडे थकीत कर्जाची रक्कम कोट्यवधींच्या घरात आहे. तर त्यावरील व्याजाची रक्कम वेगळी आहे. यामुळे हे थकीत कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेने पाऊले उचलली असून थकीत कर्ज भरण्यासाठी सूतगिरण्यांना नोटीस बजावली आहे. तरी देखील कर्ज भरणा न केल्याने मालमत्ता विक्री केली जाणार आहे. 

तीन सूतगिरण्या बँकेनेच केल्या खरेदी 

सांगली जिल्हा बँकेने यापूर्वीही या सूतगिरण्यांचा लिलाव जाहीर केला होता. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. यापैकी तीन सूतगिरण्या बॅँकेने स्वत: खरेदी केल्या आहेत. बँकेने सेक्युरिटायझेशन अ‍ॅक्ट अंतर्गत या सर्व सूतगिरण्या ताब्यात घेतल्या आहेत. बॅँकेने खरेदी केलेल्या कर्जदार संस्थांची सात वर्षात विल्हेवाट लावून बॅँकेची कर्ज वसुली करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. या संस्था खरेदी करून मार्चमध्ये पाच वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे या संस्थांकडील कर्ज वसुली कोणत्याही स्थितीत बॅँकेला करावी लागणार आहे.

या सूतगिरणी मालमत्ता विक्रीसाठी निविदा 

जिल्हा बॅँकेच्या कर्जाची थकबाकी वसुलीसाठी बॅँकेने स्वामी रामानंदभारती सहकारी सूतगिरणी तासगाव, खानापूर तालुका को ऑप स्पिनिंग मिल्स विटा, शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी इस्लामपूर, प्रतिबिंब मागासवर्गीय को ऑप इंडस्ट्रिज इस्लामपूर व विजयालक्ष्मी कॉटन मिल्स आटपाडी या पाच सूतगिरण्यांच्या मालमत्ता विक्रीसाठी निवीदा मागवल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tea : चहाप्रेमींसाठी धोक्याची घंटा! 'या' ७ चुका टाळा, नाहीतर रोजचा १ कप चहा पिणेही होईल बंद

Mangalsutra Designs For Woman: महिलांसाठी ट्रेंडी मंगळसूत्र आणि मॅचिंग कानातले सेट्स; पाहा ५ लेटेस्ट डिझाईन्स

Maharashtra News Live Update: ST बँक कथित घोटाळ्यातील बडे मासे गळला लागणार?

School Closed : ठाकरेसेनेच्या नेत्याच्या मृत्यूने ठाण्यात खळबळ, शाळांना सुट्टी जाहीर अन् दुकानेही बंद

Ghee With Warm Water: सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात एक चमचा तूप घ्या; शरीराला मिळतील हे 6 मोठे फायदे

SCROLL FOR NEXT