Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News : ९२ लाखांचे रक्तचंदन कासेगाव पोलिसांकडून जप्त; आरोपीही अटकेत

९२ लाखांचे रक्तचंदन कासेगाव पोलिसांकडून जप्त; आरोपीही अटकेत

विजय पाटील

सांगली : बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने रक्तचंदनाचे ओंडके आणलेल्या केदारवाडीच्या दोन आरोपींच्या (Sangli) सांगलीच्या कासेगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. कासेगावच्या (Police) सहायक पोलिस निरीक्षक दीपक जाधव व यांच्या टीमने ही कामगिरी केली आहे. (Latest Marathi News)

आरोपींनी दोन दिवसापुर्वी रक्तचंदन लाकडाचे ओंडके बेकायदेशीरपणे विक्री करण्याच्या उद्देशाने आणली आहेत. अशी गोपनीय बातमी कासेगांव पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली. त्यांनी प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक दीपक जाधव यांना कळविली. जाधव यांनी पोलीस अधिक्षक बसवराज तेली, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभाग पथकाकडील वनअधिकारी कर्मचारी यांच्यासह छापा टाकला. यावेळी जयकर तुकाराम पाटील (रा.केदारवाडी ता.वाळवा) यांचे मालकीच्या घरात रक्तचंदनाची एकुण २० लाकडी ओंडके आढळली. 

९२ लाखाची लाकडे 

रक्तचंदनाची एकुण  ७५८.४०० किलोग्रॅम वजनाच्या ९१ लाख ८०० रुपये किंमतीची २० लाकडी ओंडके पोलिसांनी जप्त केली आहेत..युनूस भैय्या (पूर्ण नाव माहिती नाही) आणि विजय बाळासाहेब तांबवे (रा. केदारवाडी) यांना पोलिसांनी अटक केली असुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार चंद्रकांत पवार हे करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वसतिगृहासाठी नंदुरबारमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा 20 किलोमीटरपर्यंत मोर्चा

Morning Routine: सकाळच्या या १० सवयी लावून घ्या, दिवसभर राहाल ताजेतवाने...

Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसला भीषण अपघात, भरधाव ट्रकची समोरून धडक, ४ जणांचा जागीच मृत्यू

Glass Vs Plastic Tiffin Box: टिफिनसाठी प्लास्टिकचे की काचेचे कोणते डबे वापरावे?

Fashion Jewelry Tips: आर्टिफिशियल ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीची चमक टिकवण्यासाठी ५ सोप्या टिप्स, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT