SANGLI ZP SCHOOL'S UNIQUE HAIRCUT PATTERN FOR STUDENT DISCIPLINE saam tv
महाराष्ट्र

असे गुरुजी प्रत्येक शाळेत हवेत, विद्यार्थ्यांसाठी गुरुजींचा 'हेअर कटिंग पॅटर्न'

No Fancy Hairstyles in This ZP School: जिल्हा परिषद शाळेतील एका भन्नाट उपक्रमाची सध्या राज्यभरात चर्चा रंगलीये. आजकालची मुलंं वेगवेगळ्या हेअरस्टाईल करत असतात. मात्र, ही हेअरस्टाईल शाळेतील मास्तरांसह पालकांचीही डोकेदुखी ठरतेय. त्यामुळे एका शिस्तप्रिय मास्तरांनी शाळेतच 'खास कटिंग पॅटर्न' राबवलाय. कुठे आहे ही शाळा?... नेमका काय आहे हा पॅटर्न?... पाहूयात या रिपोर्टमधून..

Rohit Kadam

कुणी म्हणे... मी विराट कोहलीसारखा कट मारलाय, तर कुणी म्हणे... माझा हेयर कट बॉलीवूड सिनेस्टारसारखा आहे... असं म्हणून विद्यार्थी शाळेत एकमेकांना चिडवत धमाल मस्ती करत असतात. मात्र, सांगलीच्या मिरज तालुक्यातील लक्ष्मीवाडीच्या जिल्हा परिषद शाळेतील मास्तरांनी यावर एकदम 'कडक' उपाय शोधून काढलाय... होय... जिथे केस कापण्यासाठी सलूनवाल्यांना पालकांना नव्हे, तर दस्तुर खुद्द गुरूजींना फोन करावा लागतो... वेळ प्रसंगी गुरूजी सूचना देण्यासाठी थेट सलूनला धडक देतात...मग इथे ना फॅशनचा अतिरेक चालतो, ना कसले वेडेवाकडे कट मारता येतात. गुरुजींच्या देखरेखीखाली एकदम साधे, स्वच्छ आणि शिस्तबद्ध केस कापले जातात. एकूणच काय तर कटिंग विद्यार्थ्यांची... मात्र स्टाईल गुरुजींची... विद्यार्थी वेडेवाकडे केस कापून शाळेत येऊ नयेत, यासाठी शाळेनं अनोखा 'सलून पॅटर्न' राबवलाय.

एव्हंढच नव्हे तर, शाळेनं राबवलेला अनोखा उपक्रम यशस्वी झाल्याचं शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितलंय... मुलांची हेअर स्टाईल अलीकडे पालकांसाठी चांगलीचं डोकेदुखी बनली होती. मात्र, शाळेच्या अनोख्या उपक्रमामुळे येथील विद्यार्थ्यांना मोठा फायदा झालाय तर पालकही समाधानी आहेत.

लक्ष्मीवाडीतल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावरच्या केसांची स्टाईल ही काही काळासाठी असते. मात्र डोक्यात रुजलेली शिस्त आयुष्यभर साथ देते. खरंतर, केस बारीक कापल्याच्या क्षुल्लक कारणावरून विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यामुळे लक्ष्मीवाडीच्या शिस्तप्रिय गुरुजींचा हा अनोखा प्रयोग.. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला ‘परफेक्ट कट’ देणारा म्हणावं लागेल...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणूक आयोगाविरोधात न्यायमूर्ती मैदानात, 'SIRमुळे लोकशाहीवर मोठं संकट'

लालचुटूक बीट खाण्याचे १० अद्भूत फायदे, मोजक्याच लोकांना माहीत असतील

Maharashtra News Live Update: धाराशिवमध्ये ऊसदर वाढीसाठी शेतकरी आक्रमक

कोरड्याठाक मराठवाड्यात रोजगारावर संकट, नवरात्रीपूर्वीच शेतमजूरांवर स्थलांतराची वेळ

Rice Manchurian Recipe: उरलेल्या भातापासून घरी बनवा टेस्टी स्पायसी राईस मंचुरियन, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT