Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime: प्रवासासाठी करत होते ऑनलाइन कॅब बुकिंग; सव्वा लाखांची फसवणूक

प्रवासासाठी करत होते ऑनलाइन कॅब बुकिंग; सव्वा लाखांची फसवणूक

विजय पाटील

सांगली : आई- वडिलांना कल्याण येथून सांगलीमध्ये आणण्यासाठी ऑनलाइन कॅब बुक करण्याचे सुरू होते. या प्रक्रिये दरम्यान तब्बल सव्वा लाखांचा गंडा (Cyber Crime) घालण्याचा प्रकार सांगलीमध्ये (Sagnli News) घडला आहे. या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (Maharashtra News)

मयूर निकम यांनी याबाबतची तक्रार दाखल केला आहे. निकम यांचे आई- वडील हे कल्याणला गेले होते. तेथून ते सांगलीकडे परत येणार होते. त्यांना येण्यासाठी निकम यांनी सांगलीतून मोबाईलवरून ऑनलाइन कॅब बुक करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो अयशस्वी ठरला.

अन्‌ अज्ञात व्‍यक्‍तीला आला फोन

कॅब बुक झाली नसल्‍याने त्‍यांनी प्रयत्‍न सोडून दिले. त्यानंतर निकम यांना अज्ञात व्यक्तीचा कॉल आला. त्याने याबाबतची विचारणा केली. यातून कॅब बुकिंगसाठी ऑनलाईन लिंक शेअर केली. निकम यांनी ही लिंक ओपन केल्यानंतर त्यांच्या क्रेडिट कार्डवरून तब्बल सव्वा लाख रुपये काढून घेण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Crime : दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत दोन गटात राडा; दगडफेक करत लाठ्याकाठ्यांनी मारहाण

Mumbai Shivaji Park : शिवाजी पार्कवर चिखलाचं साम्राज्य; दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासमोर आव्हान | VIDEO

Maharashtra Live News Update: रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

दुःखद! मुलाची आत्महत्या, १२ तासात बापानेही प्राण सोडले, धक्कादायक कारण चिठ्ठीतून उघड, बाप-लेकाच्या निधनाने नांदेड हादरलं

Accident: वडिलांच्या अस्थी विसर्जनाला जाताना काळाचा घाला, भरधाव कारची ट्रकला धडक, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT