Sangli Crime News Saam tv
महाराष्ट्र

Sangli Crime: सांगली जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्रीत २३ घरे फोडली; शिराळा तालुक्यात खळबळ

Sangali Robbery News: पोलिस या घटनेचा सध्या सखोल तपास करत असून अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम चालू आहे.

विजय पाटील

Sangli Crime News: सांगलीच्या शिराळा तालुक्यातील बिळाशी, मांगरूळ, बिळाशी, रिळे आणि अस्वलवाडी या गावात रात्री धुमाकूळ घालत चोरट्याने एकाच रात्रीत तब्बल 23 घरे फोडली आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सध्या अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज काढण्याचे काम चालू आहे. सीसीटीव्हीटीमध्ये एक चोर नसून संपूर्ण टोळी असल्याचे दिसत आहे. या चोरीचा तपास पोलीस यंत्रणा कशाप्रकारे लावेल याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Sangli Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, शिराळा (Shirala) तालुक्यातील मांगरूळमधील सर्जेराव खांडेकर, सर्जेराव पाटील, मोहन शिंदे, सदा शिंदे, पांडुरंग शेणवी यांची घरे चोरट्यांनी फोडली आहेत. तर पांडूरंग शेणवी यांचे घरातील दागिने नेल्याची माहिती समोर आली आहे. तालुक्यातील बिळाशी गावात तब्बल 14 ठिकाणी घरफोडी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

त्याचबरोबर रिळे येथील मधुकर पांडुरंग सपकाळ व संजय शंकर जाधव यांच्याही घरात कुलूप तोडून चोरट्यांनी शिरकाव केल्याचे उपसरपंच बाजीराव सपकाळ यांनी सांगितले. मांगरूळ मधील एकाच गल्लीतील चार व माळवाडा परिसरातील एक अशी ही पाच घरे आहेत. (Sangli News)

याचे मालक मुंबईत राहत असल्याने हे सर्व बंगले बंद असतात. याचा अचूक फायदा घेऊन एका रात्रीत दाराचे कुलूप कापून चोर घरात घुसले. बाहेर जोरदार पडणाऱ्या पावसाचा आधार घेऊन चोरट्याने पाचही घरे फोडली असल्याने आम्हाला काहीच समजले नसल्याचे शेजारी सांगत आहेत.

सदर घरातील मुद्देमाल चोरट्यांनी किती नेण्यात आलेला आहे हे अद्याप समजलेले नाही. एकाच रात्रीत वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल 23 ठिकाणी घरफोडी झाल्याने तालुक्यात भितीचे वातावरण पसरले आहे. पोलिस या घटनेचा सध्या सखोल तपास करत असून अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम चालू आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा, नुकसानापोटी १२८ कोटी ५५ लक्ष रुपये सरकारकडून मंजूर

Pune Rain: पुण्यात धडकी भरवणारा पाऊस, एका तासात रस्त्यांची झाली नदी; पुणेकरांचे प्रचंड हाल, पाहा VIDEO

WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपवर ऑनलाईन आहात; मित्रांनाही कळणार नाही, करा 'ही' एक सेटिंग

Santosh Juvekar: हिंदी नाटकानंतर संतोष जुवेकर लवकरच झळकणार नव्या चित्रपटात; साकारणार ही महत्वाची भूमिका

Tulja Bhawani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात एआय कॅमेरे; नवरात्रोत्सवात होणार प्रथमच वापर

SCROLL FOR NEXT