Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; पोलिसांनी छापा टाकत पाच महिलांची केली सुटका

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; पोलिसांनी छापा टाकत पाच महिलांची केली सुटका

विजय पाटील

सांगली : सांगली शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाजवळ एका अपार्टमेंटमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली (Sangli News) वेश्या व्यवसाय सुरु होता. या वेश्या अड्ड्यावर पोलिसांनी (Police) छापा टाकला. यात पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे. (Tajya Batmya)

सांगली मध्यवर्ती बसस्थानकापासून जवळच असलेल्या कल्याणकर प्लाझामधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये स्पा सेंटर, मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार डमी ग्राहक पाठवून याबाबतची खातरजमा करण्यात आली. यानंतर पथकाने तिथे जात ही कारवाई केली. यात पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे.

जागा मालकास अटक 

पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना या बाबतची टीप मिळाल्यानंतर सुरुवातीला डमी ग्राहक पाठवून या ठिकाणी पोलिसांनी ही कारवाई केली. हा अड्डा चालविण्यास जागा देणारा विक्रम पंडित यास कल्याणकरला पोलिसांनी अटक केली असून अड्डयाचा एजंट इम्रान युनुस मुल्ला मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. या दोघांवर अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

Maharashtra News Live Update: अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

Crime : बलात्कारपीडित १३ वर्षीय मुलीला न्याय हवा होता, ज्याच्याकडे मदत मागितली त्या वकिलानेही केले अत्याचार

Jana Nayagan: विजय थलापतींच्या 'जन नायकन'च्या रिलीजची तारीख ठरली; नवीन पोस्टर प्रदर्शित करत केली मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT