Sangli Crime News Saam tv
महाराष्ट्र

Sangli Crime News : घरात घुसून सराईत गुन्हेगाराला मारले; अज्ञात तरुणांकडून पहाटेच हल्ला

Samgali घरात घुसून सराईत गुन्हेगाराला मारले; अज्ञात तरुणांकडून पहाटेच हल्ला

विजय पाटील

सांगली : पोलिसांच्या रेकॉर्डवर गुन्हेगारी क्षेत्रातील सराईत असणारा गुंड सच्चा उर्फ सचिन टारझन यांच्यावर आज सकाळी जीवघेणा हल्ला झाला आहे. (Sangli News) सांगलीच्या अहिल्यानगर येथे त्याच्या घरात घुसून (Crime News) अज्ञात तरुणांनी हा हल्ला केला. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. हा हल्ला झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. (Live Marathi News)

सचिन टारझन हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील रेड यादीतील गुंड होता. एका गुन्ह्यात तो सध्या जामीनावर बाहेर आला होता. आज सकाळी सातच्या सुमारास काही आज्ञात तरुण अचानक त्याच्या घरात घुसले. त्या तरुणांनी सच्यावर धारदार हत्यारांनी हल्ला चढवला. तर काही मिनिटातच हल्ला करून ते परागंधा झाले. कुपवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलीस हल्लेखोराच्या शोधात आहेत. दरम्यान सच्चा टारझनवरील हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. 

उपचारादरम्यान मृत्यू 

सचिन टारझन याच्यावर आज सकाळी सातच्या सुमारास धारदार शस्त्राने अहिल्यानगर परिसरात खुनी हल्ला (Police) करण्यात आला. यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारा दरम्यान सकाळी १० वाजता त्याचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SIR Update : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! SIR प्रक्रियेसाठी मुदतवाढ; नागरिकांना दिलासा

Maharashtra Politics : संजय शिरसाट अडचणीत, मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा, भाजपच्या नाराजीनंतर शिंदे मोठा निर्णय घेणार?

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

SCROLL FOR NEXT