Sangli Crime News  AI Image
महाराष्ट्र

Shocking : शिक्षकी पेशाला काळिमा! स्पर्धा परीक्षा अकॅडमीत ३ विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार; शिक्षकाचं बिंग फुटलं

Sangali Crime News : सांगलीतील स्पर्धा परीक्षा अकॅडमीत तीन अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार व विनयभंगाचे आरोप. संस्थापकासह दोघांविरुद्ध आष्टा पोलिसांत गुन्हा दाखल.

Alisha Khedekar

  • सांगलीत अकॅडमीमध्ये ३ विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार

  • अकॅडमीचे संस्थापक काशीनाथ नांगरे आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा

  • मुलींना घटनेबाबत कोणालाही सांगू नये म्हणून धमकावल्याचाही आरोप

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथे शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. स्पर्धा परीक्षा शिक्षण देणाऱ्या ‘केतनराज स्पर्धा परीक्षा अकॅडमी’मध्ये तीन अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार आणि विनयभंग झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी अकॅडमीचे संस्थापक काशीनाथ नांगरे आणि मुलींना धमकावल्याचा आरोप असलेली त्यांची पत्नी मनीषा नांगरे विरुद्ध आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने मुलींच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, ११ जून २०२६ पासून हा प्रकार वारंवार घडल्याचा आरोप आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील तीन अल्पवयीन मुली या अकॅडमीत शिक्षण घेत होत्या. तसेच त्या तिथेच राहत होत्या. रात्री त्या झोपेत असताना अकॅडमीचे संस्थापक काशीनाथ नांगरेने त्यांच्याजवळ जाऊन लैंगिक अत्याचार आणि विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

घडलेल्या प्रकारामुळे विद्यार्थिनी घाबरल्या होत्या. त्यामुळे त्यांनी अकॅडमीतील मॅडम तसेच आरोपीची पत्नी मनीषा नांगरेला घडलेली हकीकत सांगितली. मात्र, त्यांना मदत करण्याऐवजी संबंधित महिलेने मुलींना कोणालाही या घटनेबद्दल सांगू नये अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे काही काळ या प्रकरणाची माहिती बाहेर आली नाही.

दरम्यान, सतत होणाऱ्या जाचाला कंटाळून अखेर पीडित विद्यार्थिनींनी आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. माहिती मिळताच संतप्त पालकांनी आष्टा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवला. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील कलम ७४, ७५(२), ३५१(२) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण करणाऱ्या (पोक्सो) कायद्यातील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, तक्रारीतील आरोपांची सखोल चौकशी केली जात आहे. अल्पवयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेशी संबंधित या गंभीर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, निवासी शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू, मनपाचा निष्काळजीपणा बेतला जीवावर? 8 महिन्यात खड्ड्यांमुळे 198 जणांचा बळी

'टेस्ला'च्या फ्लाईँग कारवर मीम्स व्हायरल, मस्क यांच्या निर्मितीला भारतीयांची मिश्किल दाद

Punjab Accident: भरधाव कारनं मनरेगा मजुरांना चिरडलं; 8 जणांचा जागीच मृत्यू

बाळूमामाची शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक, गोकुळ'च्या निवडणुकीत अंधश्रद्धेचा बाजार

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर १० राऊंड फायरिंग; 2 जण गंभीर जखमी, सिनेसृष्टीत खळबळ

SCROLL FOR NEXT