WOMAN’S SUSPICIOUS DEATH AMID DOWRY AND SON-BIAS HARASSMENT; FIVE BOOKED Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : "मुलगा होत नाही...." विवाहित महिलेची सासरच्या मंडळींकडून हत्या; पतीसह ५ कुटुंबीयांविरोधात गुन्हा

Sangli Crime News : नागपट्टीनम येथे विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला असून “मुलगा होत नाही” आणि “सोने आण” या कारणांवरून छळ केल्याचा आरोप आहे. सांगलीत पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल.

Alisha Khedekar

  • नागपट्टीनम येथे विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

  • “मुलगा होत नाही” व “सोने आण” या कारणांवरून छळाचा आरोप

  • पतीसह पाच जणांविरोधात सांगलीत गुन्हा दाखल

  • पुढील तपास नागपट्टीनम पोलिसांकडे वर्ग होणार

विजय पाटील, सांगली

Tamil Nadu Nagapattinam Suspicious Death Married Woman Harassment तामिळनाडू राज्यातील नागपट्टीनम येथे वास्तव्यास असलेल्या एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, “मुलगा होत नाही” आणि “माहेरहून सोने आणले नाही” या कारणांवरून मृत महिलेचा अनेक वर्षे मानसिक व शारीरिक छळ होत होता. मुलगा होत नाही या कारणामुळे तिची हत्या केल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी सांगली जिल्ह्यातील पलूस पोलीस ठाण्यात पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी मृत महिलेचे वडील सुभाष बळवंत कदम यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. कदम यांनी तक्ररीत म्हटले आहे की, त्यांची मुलगी आरती प्रशांत जाधव (वय ३७) हिचा विवाह प्रशांत आनंदराव जाधव याच्याशी झाला होता. विवाहानंतर आरती पतीसह तामिळनाडूतील नागपट्टीनम येथे राहत होती. सुरुवातीला सर्व काही सुरळीत असले तरी काही काळानंतर सासरच्या मंडळींकडून तिच्यावर छळ करण्यात आला

“तुला मुलगा होत नाही” तसेच “माहेरहून सोने आण” अशा कारणांवरून आरतीला वारंवार टोमणे मारणे, शिवीगाळ करणे, धमकावणे आणि मारहाण करणे असे प्रकार सातत्याने घडत होते. विशेषतः पती प्रशांत जाधव (Prashant Jadhav) आणि सासू रूपा जाधव (Rupa Jadhav) यांनी तिच्यावर शारीरिक छळ (Physical Harrasement Case) केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या सततच्या मानसिक व शारीरिक त्रासामुळे आरती खचून गेली होती. या छळातून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केला असून महिलेचा मृत्यू संशयास्पद असल्याचं म्हटलं आहे. तिच्या मृत्यूला सासरचे जबाबदार असल्याचे फिर्यादीत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणी सांगली जिल्ह्यातील पलूस (Sangli Palus News) पोलीस ठाण्यात पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित आरोपी सध्या नागपट्टीनम येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा गुन्हा २६ मे २०२६ रोजी पलूस पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्ष घटना तामिळनाडूतील नागपट्टीनम येथे घडल्याने पुढील तपासासाठी हे प्रकरण नागपट्टीनम सिटी पोलीस ठाण्याकडे (Nagapattinam City Police Station) वर्ग करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या घटनेमुळे महिलांवरील अत्याचाराचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा प्रकरणांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Guardian Minister: भरत गोगावले की तटकरे? तिढा सुटला पण, रायगडचं पालकमंत्रिपद गेलं कोणाकडं?

जांभूळ खाणे सर्वांसाठीच फायदेशीर नाही! 'या' ५ गंभीर समस्या असल्यास चुकूनही खाऊ नका

UPI Users Alert: ...तर तुमचं UPI पेमेंट तात्काळ ब्लॉक होणार, बँकांनं घेतला मोठा निर्णय

Riteish - Raja Shivaji Collection : रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' सुपरहिट! मराठीसोबत हिंदी सिनेमांनाही टाकले मागे, वाचा छप्परफाड कमाई

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील निवासस्थानाबाहेर आंदोलन

SCROLL FOR NEXT