sangli contractor dies by suicide saam tv
महाराष्ट्र

Sangli : १ कोटी ४० लाखांची थकबाकी! जलजीवन मिशन योजनेतल्या कंत्राटदारानं आयुष्य संपवलं, पैसे न मिळाल्यानं उचललं टोकाचं पाऊल

Sangli News : जलजीवन मिशन योजनेतील एका तरुण कंत्राटादाराने गळफास घेत आत्महत्या केली. योजनेचे काम पूर्ण करुनही कामाचे पैसे न मिळाल्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

विजय पाटील, साम टीव्ही, प्रतिनिधी

Sangli : जल जीवन मिशन योजनेतील तरुण कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची माहिती उघडकीस आली आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथील ३५ वर्षीय कंत्राटदाराने गळफास घेत आत्महत्या केली. १ कोटी ४० लाख रुपयांची रक्कम शासनाकडे थकीत असल्याने कंत्राटदाराने टोकाचा निर्णय घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्या तरुण कंत्राटदाराचे नाव हर्षल असे आहे. जल जीवन मिशन योजनेचे काम पूर्ण करुन देखील एका वर्षापासून कामाचे पैसे मिळत नसल्याच्या कारणातून हर्षलने स्वत:चे जीवन संपवले, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

बिले वेळेत मिळत नसल्याने मानसिक त्रासाला कंटाळून हर्षलने स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली असे म्हटले जात आहे. हात उसने आणि सावकारांच्या कडून घेतलेले पैसे यांची परतफेड कशी करायची आणि बिल मिळत नसल्याने हर्षलने आत्महत्या केल्याचा आरोप कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केले आहे.

कुरळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील या प्रकरणात अधिक तपास करत आहेत. आत्महत्येचे प्राथमिक कारण समोर आले असले तरी आत्महत्या करण्यामागील खरं कारण शोधण्यासाठी शोध सुरु असल्याचे विक्रम पाटील यांनी सांगितले आहे. या घटनेमुळे तांदूळवाडी गावात शोककळा पसरली आहे. हर्षलच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshay Kumar: अक्षय कुमारने विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट; १२ कोटींपेक्षा जास्त झाला फायदा

Ketan Agarwal Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात खळबळजनक खुलासे, पोलिसांना सापडले पुरावे; सिया-चेतन करायचे कोड वर्डने चॅटिंग

केतनच्या हत्येचं बीड कनेक्शन उघड, केतन हत्या प्रकरणात तिसरा कोण?

आधी लग्न लपवलं, रहस्य उघडकीस आलं अन् प्रेयसीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळलं, क्रूर कृत्याने संतापाची लाट

MPSC Recruitment: MPSC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ग्रुप-सीच्या २,६१९ पदांसाठी बंपर भरती; कुठे अन् कसा कराल अर्ज?

SCROLL FOR NEXT