Saam Tv Saam TV
महाराष्ट्र

Sangli Commissioner Dance : सांगली महापालिका आयुक्तांचा 'श्रीवल्ली' गाण्यावर जबरदस्त डान्स; अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही दिली दाद

Sangli News : सांगली महापालिका वर्धापन दिनानिमित्त कलासंगम 2024 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापालिकेतील सर्वच कर्मचाऱ्यांनी आयुक्तांच्या डान्सला टाळ्यांनी दाद दिली.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

Sangli News :

सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्याआयुक्तांचा हटके अंदाज एका सांस्कृतिक कार्यक्रमात दिसला. मिरजेत आयुक्त सुनील पवार यांनी पुष्पा स्टाईलने डान्स करून अधिकारी कर्मचारी यांची वाहवा मिळवली.

सांगली महापालिका वर्धापन दिनानिमित्त कलासंगम 2024 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापालिकेतील सर्वच कर्मचाऱ्यांनी आयुक्तांच्या डान्सला टाळ्यांनी दाद दिली. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सांगली मिरज कुपवाड महापालिका वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन सांगली आणि मिरजेत करण्यात आले होते. त्यामध्ये मिरज बालगंधर्व नाट्यगृह येथे कलासंगम हा महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी चित्रपटातील गाणी आणि नृत्य,नाटिका , कार्यक्रमाचे आयोजन केले होते. (Latest Marathi News)

यावेळी आयुक्त सुनील पवार, उपायुक्त स्मृती पाटील, राहुल रोकडे, वैभव साबळे यांच्यासह सहाय्यक आयुक्त सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कर्मचारी अधिकारी यांनी या कार्यक्रमात भाग घेऊन हिंदी, मराठी चित्रपटातील गाणी आणि डान्स सादर करून कर्मचाऱ्यांची मने जिंकली.

या कार्यक्रमात आयुक्त सुनील पवार यांनी पुष्पा स्टाईलने डान्स करून कर्मचाऱ्यांसोबत आनंद लुटला. या गाण्यांमध्ये उपायुक्त राहुल रोकडे, वैभव साबळे, पंडित पाटील, दिनेश जाधव, स्मृती पाटील यांनी आयुक्त यांना सहकलाकार म्हणून साथ दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शत्रूंपासून सावध राहा, किरकोळ खर्च टाळा; ५ राशींच्या लोकांना मोठ्या संकटाना सामोरे जावे लागणार

Beed Crime: तू माझ्याशी का नाही बोलत? चारित्र्याच्या संशयावरून तरुणीवर जीवघेणा हल्ला; घरात घुसून चाकूने सपासप वार, परळी हादरले

Varanasi : मांस विक्री व्यवसायावर मोठा बदल; टप्प्याटप्प्याने दुकाने शहराबाहेर हलवणार, कुठे आणि का?

Maharashtra News Live Update: राष्ट्र्वादीची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवांरांच्या नेतृत्वाखाली बैठक सुरू

चुकीचा तपास नडला; जिवंत मुलीला मृत ठरवून वडिलांना-भावाला केली होती अटक, दोन पोलीस निरीक्षकांचे निलंबन

SCROLL FOR NEXT