Damaged car of BJP MLA Sudhir Gadgil after a collision with a motorcycle near Miraj on the Ratnagiri-Nagpur highway. saam tv
महाराष्ट्र

भाजप आमदाराच्या कारला भीषण अपघात; पुढच्या भागाचा चक्काचूर, एअरबॅग्जही उघडल्या, ५ जखमी

Sudhir Gadgil Car Accident Near Miraj Latest Update: सांगलीचे भाजपा आमदार सुधीर गाडगीळ यांच्या गाडीचा मिरजजवळ अपघात झाला असून त्यात पाच जण जखमी झाले आहेत. एका दुचाकीस्वाराची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Omkar Sonawane

विजय पाटील, साम टीव्ही

सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ (MLA Sudhir Gadgil) यांच्या कारला रत्नागिरी-नागपूर महामार्गावर मिरजजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सुधीर गाडगीळ यांच्यासह त्यांचे सहकारी किरकोळ जखमी झाले असून एका दुचाकीस्वाराची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात इतका भीषण होता की आमदारांच्या कारच्या पुढील भागाचे (बोनट) मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आमदार सुधील गाडगीळ हे कर्नाटकमधील उगार येथून सांगलीच्या दिशेने परतत होते, दरम्यान मिरजजवळ रत्नागिरी-नागपूर महामार्गावर त्यांच्या चारचाकी वाहनाने एका दुचकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळेच हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

आमदारांच्या बोटाला दुखापत, सहकाऱ्यांची प्रकृती स्थिर

या अपघातामध्ये आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हाताच्या बोटाला मार लागला आहे. तर त्यांच्या गाडीचे चालक, स्वीय सहाय्यक आणि अंगरक्षक यांच्यासह ४ ते ५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने आमदारांसह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती समोर आली आहे.

दुचाकीस्वार गंभीर, रुग्णालयात उपचार सुरू

या अपघातात धडक बसलेला दुचाकीस्वार मात्र गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, सध्या त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: विमानापेक्षा इमान महत्वाचा...; ठाकरे-फडणवीसांच्या एकत्र विमान प्रवासावरून शिंदे संतापले

Rohit Shetty: रोहित शेट्टींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; 20 कोटींच्या खंडणीची मागणी अन्..., नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: उद्धव ठाकरेंच्या स्वागताला हिंगोलीत शिवसैनिकांची तुफान गर्दी

Hair oil benefits: जर तुम्ही महिनाभर केसांना तेल लावलं नाही तर काय होऊ शकतं?

Karjat Fort : कर्जतमध्ये लपलाय मराठा साम्राज्यातील महत्त्वाचा किल्ला, शत्रूंच्या हालचालींवर ठेवायचे बारीक लक्ष

SCROLL FOR NEXT