Sangli accident  Saam tv
महाराष्ट्र

Sangli : आईचा हात पकडून मुलगा घरी निघाला; अर्ध्यात काळाने डाव साधला; ६ वर्षीय मुलाला डंपरने चिरडलं

Sangli accident : सांगलीत ६ वर्षीय चिमुकल्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. चिमुकल्याच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

विजय पाटील

सांगलीच्या भिलवडी येते शाळेतून घरी परतणाऱ्या शाळकरी मुलावर डंपर अंगावर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना शनिवारी सकाळी सरळी पुलाजवळ घडली. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. भिलवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मृत मुलाचे नाव राज वैभव पवार (वय ६ ) असे आहे. राज हा भिलवडीमध्ये राहायला होता. तो भिलवडी येथील खासगी मराठी प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीमध्ये शिक्षण घेत होता. शाळा सुटल्यानंतर आईसोबत घरी परतत असताना माळवाडीहून भिलवडीकडे येणाऱ्या डंपर चालकाचा ताबा सुटल्याने डंपरने सरळी पुलाजवळ थेट राजला चिरडले. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर इनामुल सुतार यांनी गंभीर जखमी अवस्थेतील राजला तातडीने दवाखान्यात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले होते. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण भिलवडी गावावर शोककळा पसरली आहे. निष्पाप बालकाच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. भिलवडी पोलीस ठाण्याचे अधिकारी अपघातानंतर पसार झालेल्या डंपर चालकाचा शोध घेत आहेत. पोलिसांचा या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

पुण्यात बसचा अपघात

पुण्यात पीएमपी बसचा अपघात झाला आहे. पुण्यातील दोन बस एकमेकांना धडकल्या. गणपती माथा येथे बस वळवताना पीएमपी बसला मागून दुसऱ्या पीएमपी बसची धडक बसली. या अपघातात एका बसच्या पाठीमागच्या काचा फुटल्या. सुदैवाने दोन्ही बसमध्ये प्रवासी नसल्याने कोणीही जखमी झालं नाही. या बस अपघातानंतर वाहतूक कोंडी झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Free chicken distribution in pune : ओळखपत्र दाखवा अन् चिकन मोफत न्या; जोडप्याने वाटलं 5000 किलो चिकन मोफत, VIDEO

Monday Horoscope : वरिष्ठांच्या नजरेत प्रतिमा उंचावेल, विष्णू उपासना फायदेशीर ठरणार; 'या' राशींच्या लोकांना प्रेमात लाभ होणार

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंची युती कधी होणार? उद्धव ठाकरेंचा युतीबाबत नवा दावा?

Marathi Language Controversy: मुंबईत पुन्हा मराठी-हिंदी वाद उफाळला; परप्रांतीय महिलेचा मराठी बोलण्यास नकार, VIDEO

Couple Romance Viral video : आता याला काय म्हणावं? गर्लफ्रेंडने डोके मांडीवर ठेवले अन्...; उडत्या विमानात कपलचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT