Sangitatai Pawar x
महाराष्ट्र

Sangitatai Pawar : दगडाने ठेचून खून, त्याचवेळी मंदिरात चोरी; महिला कीर्तनकार हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर

Women kirtankar Sangitatai Pawar Murder : छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला कीर्तनकार ह.भ.प. संगीताताई पवार यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.

Yash Shirke

डॉ. माधव सावरगावे, साम टीव्ही, प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथे महिला कीर्तनकार ह.भ.प. संगीताताई पवार यांची हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या घटनेदरम्यान मंदिरामध्ये चोरी झाल्याचे उघडकीस आली आहे. नव्या माहितीमुळे हत्या प्रकरणाला वेग येणार असल्याचे म्हटले जात आहे.

ह.भ.प. संगीता पवार यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. हत्येदरम्यान मंदिरात चोरी देखील झाली होती. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सदर घटना कैद झाली. कॅमेऱ्यातील फुटेज समोर आले आहे. फुटेजमध्ये आरोपी हे हिंदी भाषेमध्ये बोलत आहेत. त्यांचे अंदाजे वय वीस ते पंचवीस वर्षे असावे असा अंदाज वर्तवला जात आहे. या आरोपींबाबत किंवा गँगबाबत कोणालाही माहिती असल्यास छत्रपती संभाजीनगर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा किंवा विरगाव पोलिसांशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

एप्रिल महिन्यात संगीता पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यांनी वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन त्याबाबतची तक्रार देखील दिली होती. जागेच्या वादातून शेजारी भांडत आहेत, असे त्यांनी सांगितले होते. मी एकटीच राहते, मला मारुन टाकतील असे संगीता पवार पोलिसांसमोर म्हणाल्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, आश्रमातील मंदिरातील पुजारी शिवाजी चौधरी सकाळी नेहमीप्रमाणे पूजेसाठी आले. त्यावेळी ह.भ.प. संगीता पवार यांना पुजाऱ्यांनी आवाज दिला. पण प्रतिसाद न आल्याने त्यांनी मंदिराच्या शेजारी असणाऱ्या शेडमध्ये पाहिले. तेव्हा रक्ताच्या थारोळ्यामध्ये संगीताताई पडलेल्या होत्या. त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केल्याीची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT