सचिन बनसोडे
संगमनेर (अहिल्यानगर) : संगमनेरचा विजय हा गोरगरीब जनतेचा आहे. इथल्या लोकांना ४० वर्षांपासून न्यायाची अपेक्षा होती; ती यावेळी पूर्ण झाली. अमोल खताळ एकटे आमदार नाही, तर त्याच्यासोबत उभा असणारा प्रत्येकजण आमदार आहे. जिल्ह्यात सत्तेचा माज करणाऱ्यांचा आम्ही कार्यक्रम लावला; अशी प्रतिक्रिया सुजय विखे पाटील यांनी संगमनेरमध्ये अमोल खताळ यांच्या विजयानंतर दिली आहे.
संगमनेरमध्ये (Sangamner News) काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव करत अमोल खताळ यांनी विजय मिळविला आहे. त्यांच्या विजयानंतर संगमनेर शहरात जल्लोष करण्यात आला असून सुजय विखे पाटील यांचे संगमनेर शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. ४० वर्षात प्रथमच संगमनेर तालुक्यात परिवर्तन घडले असून यावर (Sujay Vikhe Patil) सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया देत बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे.
सुजय विखे पाटील म्हणाले, कि अमोल खताळच्या माध्यमातून आम्ही जे शब्द दिले ते आता पूर्ण करणारच. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने संगमनेरच्या जनतेने सर्वात मोठी भेट दिली. बाळासाहेब थोरात गे हवेत होते. मात्र अमोल खताळच्या रूपाने संगमनेरच्या विकासाचा नवीन सूर्य उगवला आहे.
गनिमी काव्याने विजय
मी लोकसभा पराभवाचा बदला घेतला नाही. पण कार्यकर्त्यांनी घेतला असेल तर मला माहीत नाही. मात्र संगमनेरमध्ये आम्ही गनिमी काव्याने विजय मिळवला आहे. मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणाऱ्याला सामान्य माणसाने पराभूत केले. थोरातांनीच दहशत से आजादी ही टॅगलाईन शोधून काढली. मात्र लोकांनी त्यांनाच आझाद करून टाकलं; अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला. सरकार स्थापन होताच संगमनेरचा पाणी प्रश्न सोडवणार, असे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.