Sangamner Mendhavan soldier Ramdas Sahebrao Badhe martyred Saam TV News
महाराष्ट्र

Ramdas Sahebrao Badhe : दोस्तो..साथीयों, हम चले, दे चले; पाकिस्तानसोबतच्या गोळीबारात संगमनेरचे जवान रामदास बढे शहीद

Sangamner Soldier Ramdas Sahebrao Badhe Martyred : गोळीबारात जखमी झाल्याने भारतीय लष्करात हवालदार पदावर कार्यरत असलेल्या संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावचे रामदास साहेबराव बढे हे जवान शहीद झाले आहेत.

Prashant Patil

सचिन बनसोडे, साम टीव्ही

अहिल्यानगर : सैन्य दलातून एक अतिशय दु:खद बातमी समोर आली आहे. काल सोमवारी काश्मीर खोऱ्यातील तंगधार क्षेत्रात पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरु झाल्यानंतर भारतीय जवानांनीही त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले. मात्र, दुर्दैवाने या गोळीबारात जखमी झाल्याने भारतीय लष्करात हवालदार पदावर कार्यरत असलेल्या संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावचे रामदास साहेबराव बढे हे जवान शहीद झाले आहेत. त्यांचे पार्थिव खोऱ्यातून मुंबईला विमानाने पाठवण्यात आले असून उद्या मेंढवण या त्यांच्या मूळगावी येणार असून त्यांच्यावर संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

रामदास साहेबराव बढे हे ३४ एफ रेजिमेंटमध्ये हवालदार म्हणून कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील तंगधार जिल्ह्यात ऑपरेशनल ड्युटी करत असताना नियंत्रण रेषेवर बढे यांचे निधन झाले. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. मात्र स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. उद्या, बुधवारी २६ मार्च रोजी दुपारी १ वाजता त्यांच्या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. अंत्यविधी प्रसंगी युद्धातील अपघातांसाठीच्या मानकांचे पालन केले जाणार आहे.

अत्यंत गरिबीच्या परिस्थिती झगडत बढे सैन्य दलात दाखल झाले होते. त्यांच्या मृत्यूने मेंढवणसह संगमनेर तालुक्यात शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT