Elderly woman shows remarkable courage as she traps a leopard inside her house to save a child in Sangamner. Saam tv
महाराष्ट्र

धाडसी आजीचा पराक्रम! बिबट्याला घरात कोंडून नातवाचा जीव वाचवला

Grandmother Saves Child From Leopard Attack In Maharashtra: संगमनेरमध्ये ६५ वर्षीय आजीनं दाखवली अद्भुत धाडसाची किमया. घरात घुसलेल्या बिबट्याला चकवत नातवाला वाचवलं आणि बिबट्यालाच घरात कोंडून ठेवलं. वनविभागाच्या मदतीनं अखेर बिबट्याला पकडण्यात यश.

Saam Tv

घरात घुसलेल्या बिबट्याच्या तावडीतून मुलाला वाचवण्यासाठी आईनं जे केलं ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल...या जिगरबाज आईनं नेमक काय केलं पाहूयात हा विशेष रिपोर्ट...बिबट्याला पुढं बघितल्यावर यमराचं दर्शन झालं म्हणून समजा... पणं एका 65 वर्षाच्या अजीनं थेट बिबट्यालाच गंडवलंय... अशी काय आयडिया लढवलीय... थेट बिबट्यालाच कोंडला...

घटना संगमनेरच्या खारशिंदे गावची सकाळच्या पारी अजी दारात भाकरी थापत बसली हुती... पोरगं डाराडूर दारात झोपलं होतं....अन् इतक्यात एंट्री झाली बिबट्याची... शिकारीच्या नादात बिबट्या शिरला घरात...अन् अजीचं गेलं ध्यान... टायमावर अजीनं लढलं डोकं.. पोराला हळुच बिछान्यासह दारातनं ओढलं... अन् धाडदीशी दरवाजा वढला न् कढी लावली... जागेवर बिबट्याचा गेम अन् थेट बिबट्याला कैद...

बिबट्या कैद झाल्या बरोबर यंत्रणा हल्ली... फॉरेस्टवालं जागेवर पिंजार घेवून खटक्यात हजर... बिबट्या घरात अन् फॉरेस्टवालं बाहेर... तासा भराच्या कसरतीनंतर बिबट्याला लावला डार्ट अन् थेट घातला पिंजऱ्यात... कुणी कायही म्हणा पण या सगळ्या ऑपरेशन बिबट्याची HERO OF THE MATCH आजीच... आजीला सलाम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टीईटी पेपरफुटीप्रकरणी शिक्षक क्रांती संघटना आक्रमक; परीक्षा शुल्क परत करण्याची मागणी

Chalisgaon Tourist Hidden: चाळीसगावजवळ लपलेली Top 5 पर्यटनस्थळे, एका दिवसात फिरून या

Kudal Tourism : पावसाळ्यात कोकणात गेल्यावर 'कुडाळ' हे ठिकाण नक्की फिरा, पाहा ५ निसर्गरम्य पर्यटन स्थळे

एकनाथ शिंदेंच्या आमदाराची 40 लाखांची डिल, कथित व्हिडिओ व्हायरल; राजकारणात मोठा भूकंप

Maharashtra Politics: विमानापेक्षा इमान महत्वाचा...; ठाकरे-फडणवीसांच्या एकत्र विमान प्रवासावरून शिंदे संतापले

SCROLL FOR NEXT