Kirtankar Sangram Bhandare faces backlash in Sangamner after controversial remarks on Godse and Bishnoi. Saam Tv
महाराष्ट्र

Balasaheb Thorat: कीर्तन की राजकीय तमाशा? कीर्तनकारांकडून गोडसे, बिश्नोईचं उदात्तीकरण

Balasaheb Thorat vs Sangram Bhandare: संगमनेरमध्ये कीर्तनकार संग्राम भंडारेंच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलयं. भंडारेंच्या कीर्तनसेवेवेळी गोंधळ का झाला? थोरातांनी भंडारेंविरोधात आंदोलन का केलं? भंडारेंनी पुन्हा कोणतं वादग्रस्त विधान केलयं?

Suprim Maskar

हे आहेत.. कीर्तनकार संग्राम बापू भंडारे.. गळ्यात तुळशीमाळ, कपाळी गंध.. खांद्यावर उपरणं.. आणि कीर्तनाला समोर गर्दी... मात्र त्याचं हे कीर्तन ऐका... सामाजिक प्रबोधनाऐवजी यात राजकीय मतच जास्त...संगमनेरमध्ये एक कीर्तनादरम्यान गोंधळ झाला आणि कीर्तनकारांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना आम्ही नथुराम गोडसे होऊ, अशी धमकीच दिलीय.

भंडारेंच्या विधानानंतर थोरातांनीही आक्रमक पवित्रा घेतलाय. वारकरी संप्रदायात राजकारण कशाला असा सवाल करत तत्व आणि विचारांसाठी बलिदान द्यायला आपण तयार असल्याचं त्यांनी थेट म्हटलय.दरम्यान बाळासाहेब थोरातांसह त्यांच्या समर्थकांनी भंडारेंनी केलेल्या वादग्रस्त विधानावर आक्षेप घेत..संगमनेरमध्ये आंदोलन केलं. यावेळी बाळासाहेब थोरातांनी भंडारेंना गृहखात्याचा पाठिंबा आहे का? असा सवाल उपस्थित केलाय.

यानंतर थोरातांच्या समर्थकांनी आपल्या वाहनांची तोडफोड केल्याचा आरोप भंडारेंनी केलाय. या सर्व आरोपांना सभांमधून लाव रे तो व्हीडीओ म्हणत प्रत्युत्तर दिलं. तर थोरातांवर हल्ला करतोय, असं आपण म्हटल नसल्याची सारवासारव करतानाच भंडारेंनी पुन्हा आमच्यातही बिश्नोई असल्याचं वादग्रस्त विधान केलयं...

या आरोप-प्रत्यारोपांतून संगमनेरमध्ये वातावरण तापलयं.. किर्तनकारांची मोठी परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून काही कीर्तनकारांकडून केली जाणारी राजकीय टीकाटिप्पणी पाहता बाहेरून कीर्तन आणि आतून तमाशा अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झालीय.

महाराष्ट्राला किर्तनकारांची मोठी परंपरा लाभली आहे.मात्र गेल्या काही वर्षांपासून काही कीर्तनकार आपल्या पूर्वरंगातच राजकीय अजेंडा राबववत असल्याचं दिसून येतय..रामकृष्ण हरी एेवजी आता नथुराम गोडसे आणि बिश्नोईची भलावण केली जात असेल तर अशांसाठी तुकोबांनीच म्हणून ठेवलंय तुका म्हणे एेशा नरा..मोजूना माराव्या पैजारा.

महाराष्ट्राला किर्तनकारांची मोठी परंपरा लाभलीय. मात्र गेल्या काही वर्षांत काही कीर्तनकार राजकीय टीकाटिप्पणी करत असल्याचं पाहायला मिळतयं.. जय जय रामकृष्ण हरी ऐवजी नथुराम की जय आणि बिश्नोईची भलावण केली जात असेल तर हा तमाशा आपण गप्प राहून पाहणार आहोत की याला महाराष्ट्र म्हणून योग्य प्रतिउत्तर देणार आहोत? याचा निर्णय सरकारनंही घ्यायला हवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

SCROLL FOR NEXT