Sangali ST Driver News Saam TV
महाराष्ट्र

Sangali News : वेळेत पगार न झाल्याने एसटी कर्मचाऱ्याने संपवलं जीवन; मन सुन्न करणारी घटना

सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका एसटी बस चालकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.

विजय पाटील, साम टीव्ही, सांगली

Sangali ST Driver News : सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका एसटी बस चालकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. वेळेवर पगार न झाल्यानं त्याने टोकाचं पाऊल उचललं असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. (Latest Marathi News)

भीमराव सूर्यवंशी असं आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे. सूर्यवंशी हे कवठेमहांकाळ बस आगारात चालक पदावर कार्यरत होते. ते कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण गावाचे रहिवाशी आहे. गुरूवारी पहाटेच्या सुमारास त्यांचा मृतदेह राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

न्यायालयाचा आदेश असूनही महामंडळाकडून वेळेवर मिळत नसल्याने भीमराव सूर्यवंशी यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची परिसरात चर्चा आहे. मात्र, या मागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कवठेमहंकाळ पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह कवठेमहांकाळ शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन साठी पाठवण्यात आला आहे.

सत्ता बदलानंतरही ८८ हजार एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकले

महाविकास आघाडी सरकारप्रमाणे बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप सरकारच्या काळात पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत. निम्मा फेब्रुवारी गेला, मात्र अद्याप ८८ हजार एसटी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा जानेवारीचा पगार झालेला नाही. यात नागपूर विभागातील अडीच हजार कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. यामुळे कामगार संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत एसटी महामंडळाला पुन्हा एकदा न्यायालयात खेचण्याची तयारी केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यां काय दिले होते आश्वासन?

एसटी कर्मचाऱ्यांनी २०२१ मध्ये महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी संप केला होता. संपावेळी त्यांच्या वेतनासाठी चार वर्षे पूर्ण रक्कम देण्याचे तसेच प्रत्येक महिन्याच्या ७ ते १० तारखे दरम्यान वेतन देण्याचे न्यायालयाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने सरकारच्या वतीने न्यायालयात मान्य केले होते. पण या महिन्याची १५ तारीख उलटून गेली तरी सरकार कडून वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT