Jayant Patil  SAAM TV
महाराष्ट्र

Sangali NCP News: भाजप नेत्यावरील ED ची कारवाई दाखवा, १ लाख मिळवा; जतमधील डिजीटल बोर्डची रंगली चर्चा...

ED Issued Notice To Ncp Leader Jayant Patil: आयएल अँड एफएस प्रकरणात पडताळणीसाठी ईडीने जयंत पाटील (Jayant Patil) यांना नोटीस बजावली आहे.

विजय पाटील

Sangali News: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आल्याने खळबळ उडाली आहे. राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी होत असतानाच जयंत पाटील यांना ईडीकडून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

या ईडीच्या नोटीशीनंतर सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून कारवाईच्या निषेधार्थ डिजीटल बोर्ड लावण्यात आले आहेत. ज्यावर भाजप नेत्यावर इडीची कारवाई दाखवा आणि १ लाख रुपये मिळवा, अशी घोषणाही करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली जिल्ह्याचे (Sangali News) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ED ने नोटीस दिल्याने खळबळ उडाली आहे. या नोटीशीच्या निषेधार्थ जत राष्ट्रवादी (NCP) युवक कॉग्रेसने जतच्या एसटी स्टँड येथे चक्क डिजिटल बोर्ड लावले आहेत. (Latest Marathi News)

"भाजपच्या (BJP) नेत्यावर ईडीची कारवाई दाखवा आणि 1 लाख रुपये बक्षीस मिळवा," असा मजकुरचा बॅनरवर लावला आहे. जयंत पाटील यांना ईडीने पाठवलेल्या नोटीसचा जाहीर निषेध हा डिजिटल बोर्ड लावून केला आहे. राजकीय क्षेत्रात या डिजिटल बोर्डची चर्चा चांगलीच रंगली आहे.

आयएल अँड एफएस प्रकरणात पडताळणीसाठी ईडीने जयंत पाटील (Jayant Patil) यांना नोटीस बजावली आहे. आयएल अँड एफएस प्रकरणात एका व्यक्तीला अनेक कंत्राटं मिळाली होती. त्या व्यक्तीने अनेकांना कमिशन दिल्याचा ईडीला संशय आहे. या संशयाची पडताळणी करण्यासाठी जयंत पाटील यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT