Sangali News Saam Tv
महाराष्ट्र

Success Story Farmer Girl : शेतकऱ्याच्या लेकीची कमाल, सांगलीची प्रियांका महाराष्ट्रात अव्वल, महिला व बालविकास विभागात झाली अधिकारी

Sangali News : सांगलीच्या नवेखेड गावातील शेतकच्या मुलीने आठ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर महिला व बालविकास विभागाच्या परिविक्षा अधिकारी परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवत यश संपादन केले आहे.

Alisha Khedekar

  • प्रियांका दळवीने महिला व बालविकास विभागाच्या परीक्षेत महाराष्ट्रात मुलींच्या गटातून प्रथम क्रमांक पटकावला.

  • आठ वर्षांच्या सततच्या परिश्रमानंतर हे ऐतिहासिक यश मिळाले.

  • यशानंतरचा भावनिक क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला.

  • प्रियांकाच्या यशाने ग्रामीण भागातील तरुणींना प्रेरणा मिळाली.

सांगली जिल्ह्यातील नवेखेड या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबातील प्रियांका विश्वजीत दळवी हिने आपल्या मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्रात मुलींच्या गटातून महिला व बालविकास विभागाच्या परिविक्षा अधिकारी पदावर प्रथम क्रमांक मिळवून ऐतिहासिक यश संपादन केले आहे. सलग आठ वर्षे अखंडित अभ्यास, अपयशाची पर्वा न करता केलेले प्रयत्न आणि स्वतःवर असलेला विश्वास या जोरावर तिने हा टप्पा गाठला. काल सकाळी या स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर होताच प्रियांकाने आपल्या मेहनतीचे फळ मिळवले. निकालाच्या घोषणेनंतर ती अभ्यास करत असलेल्या शाहू स्पर्धा परीक्षा केंद्रावर तिचा भव्य सत्कार करण्यात आला.

या सत्कारावेळीचा भावनिक क्षण सर्वांच्या मनाला भिडणारा ठरला. प्रियांकाला शुभेच्छा देण्यासाठी आई वडील दुचाकीवरून थेट केंद्रावर पोहोचले. त्यांना पाहताच प्रियांकाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आणि ती धावतच वडिलांच्या गळ्यात पडली. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर यश मिळाल्याचा तो क्षण इतका भावूक होता की प्रियांकाच्या आई वडिलांच्याही डोळ्यांतून अश्रू ओघळले. उपस्थितांनाही हा क्षण भावला आणि साऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात या यशाचा आनंद व्यक्त केला.

प्रियांकाचे वडील शेतकरी असून घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत साधी आहे. तरीही मुलीच्या शिक्षणात कुठेही कमी पडू नये म्हणून त्यांनी कष्टाचे सोने केले. प्रियांकानेही पालकांच्या त्यागाचे मोल जाणून, अभ्यासाला प्राधान्य देत प्रत्येक दिवस स्वतःला घडवण्यात घालवला. परीक्षेतील पहिल्या प्रयत्नांमध्ये अपयश आले तरी ती डगमगली नाही. उलट अपयशातून शिकत पुढच्या प्रयत्नात सुधारणा करत राहिली. अखेर या सातत्यपूर्ण मेहनतीचे चीज झाले आणि प्रियांकाने महाराष्ट्रात अव्वल येत गावाचे नाव राज्यभर उज्ज्वल केले.

तिच्या या यशामुळे संपूर्ण नवेखेड गावात उत्साहाचे वातावरण आहे. मित्रपरिवार, नातेवाईक आणि गावकरी तिच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करत आहेत. सोशल मीडियावरही प्रियांकाच्या यशाचा आणि तिच्या वडिलांना मिठी मारतानाचा भावनिक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. प्रियांकाने आपल्या यशाचे श्रेय पालकांचा त्याग, मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि सतत साथ देणारे मित्र यांना दिले आहे. तिच्या यशाने ग्रामीण भागातील अनेक तरुणींना नव्या उमेदीतून स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे मराठा आरक्षण अडचणीत; उपसमितीसमोर पेच

Accident: कासार मलईजवळ रिक्षाला मोठा अपघात, चालकासह तिघांचा मृत्यू

Turmeric For Skin: हळदीमुळे चेहऱ्याला होतात हे फायदे; केमिकल क्रिमपेक्षा ट्राय करा ही हळदीपासून तयार पेस्ट

Manoj Jarange Attacks Raj Thackeray: राज ठाकरे कुचक्या कानाचे,मनोज जरांगेंचा हल्लाबोल

Lunch Box: मुलांच्या डब्याला द्या 'हे' चमचमीत अन् हेल्दी पदार्थ

SCROLL FOR NEXT