Manoj Jarange Patil Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: मामा-भाच्याचं अतूट प्रेम; मनोज जरांगे पाटलांसोबत संदिपान भूमरे खंबीरपणे उभे; विलास भूमरे नेमकं काय म्हणाले?

Rohini Gudaghe

अक्षय शिंदे, साम टीव्ही जालना,

आंतरवाली सराटीत छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदिपान भूमरे यांचे पुत्र विलास भूमरे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे. जरांगे पाटील आणि भुमरे साहेबांचं मामा -भाच्याचं अतूट प्रेम आहे. भाच्यासोबत मामा खंबीरपणे उभे राहतील, जरांगे पाटलांच्या मागण्यासाठी सरकार देखील सकारात्मक असल्याचं विलास भूमरे यांनी सांगितलं आहे. एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाचा तिढा लवकरच सोडवतील, असा विश्वास देखील विलास भूमरे यांनी व्यक्त केला आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणात सगे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषण (Antarwali Sarathi) सुरू केलं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये सगेसोगरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी. मराठा समाजाला सरकारने ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे.

मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला ८ जूनपासून पुन्हा सुरूवात झाली आहे. काल जरांगे पाटलांच्या उपोषणाचा दुसरा दिवस होता. तेव्हा छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदिपान भूमरे यांचे पुत्र विलास भूमरे यांनी भेट घेतली (Vilas Bhumre Met Manoj Jarange Patil) आहे. सगे सोयरे अधिसुचनेच्या अंमलबजाणीच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत आमरण उपोषण करत आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे.

दरम्यान राज्यातील अनेक नेते त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देत आहे. काल रात्री संभाजीनगरचे नवनियुक्त खासदार संदिपान भूमरे यांचे पुत्र विलास भूमरे (Sandipan Bhumre Son Vilas Bhumre) यांनी अंतरवाली सराटीत येऊन जरांगे यांची भेट घेतली आहे. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला (Manoj Jarange Patil Hunger Strike) आहे. दरम्यान जरांगे पाटलांच्या मागण्यासाठी सरकार सकारात्मक असून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष घालून तिढा सोडवतील, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malvan Statue Incident: मालवणमधील शिवरायांचा पुतळा दुर्घटनेत मोठी कारवाई! उत्तर प्रदेशमधून तिसऱ्या आरोपीला अटक; पोलीस कोठडीत रवानगी

PM Kisan Yojana: बळीराजासाठी केंद्राची खास योजना! मिळतात ६ हजार रुपये; जाणून घ्या

Maharashtra News Live Updates: भाजपचे अनेक नाराज पदाधिकारी आज ठाकरेंची मशाल घेणार

Baba Siddiqui Death:सलमान खानला मारण्याची सुपारी, पानिपतमधून पनवेल पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Rahu Nakshtra Gochar: राहुच्या नक्षत्र गोचरमुळे 'या' राशी होणार मालामाल; नव्या नोकरीसह मिळणार अफाट पैसा

SCROLL FOR NEXT