sangli crime news saam tv
महाराष्ट्र

Sangli: तहसीलदार बाई माने यांना जिवे मारण्याचा प्रयत्न; वाळू तस्करांचे कृत्य

चालकाच्या प्रसंगावधानाने तहसीलदार आणि वाहनातील महसूल पथकाचे कर्मचारी यांना काेणतीही इजा झाली नाही.

विजय पाटील

सांगली : आटपाडी (atpadi) तालुक्यातील तहसीलदारांच्या शासकीय वाहनावर आटपाडी-मुंढेवाडी रस्त्यावर साेमवारी रात्री वाळू तस्करांनी (sand mafia) हल्ला केला. तहसीलदार बाई माने (tashildar bai mane) यांच्या वाहनावर डंपर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला. (sangli latest marathi news)

दरम्यान चालकाच्या प्रसंगावधानाने तहसीलदार आणि वाहनातील अन्य महसूल कर्मचारी सुखरूप आहेत. डंपरच्या धडकेनंतर वाहनाचे (vehicle) दरवाजे डंपरमध्येच सापडल्याने तहसीलदार काही काळ वाहनातूनच अडकून पडल्या होत्या.

तहसीलदार बाई माने या अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी पथकासह रात्री गेल्या होत्या. यावेळी आबानगर चौकात गस्त घालत असताना डंपर भरधाव वेगाने निघाला हाेता. महसूलच्या पथकाने त्याचा पाठलाग केला परंतु डंपर चालकाने त्यांना चकवा दिला. त्याच ठिकाणी थोड्यावेळ गस्त घालत असताना मुंढेवाडीकडून भरधाव डंपर आला आणि तहसीलदार यांच्या वाहनावर डंपर घातला. चालकाच्या प्रसंगावधानाने तहसीलदार आणि वाहनातील महसूल पथकाचे कर्मचारी यांना काेणतीही इजा झाली नाही.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gayatri Datar Wedding: 'तुला पाहते रे' फेम गायत्री दातार अडकली लग्नबंधनात! थाटामाटात पार पडला विवाहसोहळा, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: नाशिकच्या येवला तालुक्यात मुसळधार पाऊस, कांद्याचं झालं नुकसान

Thane Tourism : शाळेला सुट्टी पडली; लाडक्या मुलांसोबत प्लान करा फॅमिली ट्रिप, फिरा ठाण्यातील 'ही' २ सुंदर हिल स्टेशन्स

Jaljeera Benefits: उन्हळ्यात थंडगार जलजीरा प्यायल्याने शरीराला मिळतात हे ७ फायदे

APY Scheme: केंद्र सरकारची जबरदस्त योजना! २ कप चहाचे पैसे वाचवा अन् ₹५००० पेन्शन मिळवा

SCROLL FOR NEXT