shahpur, samruddhi mahamarg, shahapur saam tv
महाराष्ट्र

Saam Impact : 'साम टीव्ही' च्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले, शहापूरच्या 'त्या' समस्येवर उपाययाेजनेस प्रारंभ

samruddhi mahamarg shahapur : यापुर्वी कोणतीही सुरक्षेची उपाययोजना केली गेली नाही.

Siddharth Latkar

- फय्याज शेख

Shahpur News : समृद्धी महामार्गाचे काम करताना केलेल्या खाेदकामामुळे पावसाचे पाणी साचले. त्यामुळे शहापूर येथील विंचू पाडा आणि काष्टी या दाेन पाड्यांचा संपर्क तुटला. परिणामी ग्रामस्थांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. या समस्येचे वृत्त साम टीव्हीने प्रसारित करताच प्रशासन खडबडून जागे झाले. सध्या घटनास्थळी प्रशासनाने उपाययाेजना करण्यास प्रारंभ केला आहे. (Maharashtra News)

शहापूर तालुक्यातून जात असलेल्या समृद्धी मार्गाचा काम पुर्ण तत्वावर आले आहे. हा महामार्ग बनवताना अनेक ठिकाणी खोदकाम केले आहे. या खोदकामामुळे नदी, नाले तलावाचे स्वरूप आले आहे. याची कोणतीही सुरक्षेची उपाययोजना केली गेली नाही.

काही ठिकाणी रहदारीचा रस्ता खोदल्याने उन्हाळ्यात कसे बसे लोक जात होते. गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे समृद्धी मार्गा लगत नदी ,नाले, तलावाचे स्वरूप प्राप्त झाल्याने काही पाड्यातील लोकांना खरेदी साठी बाजरापेठेत येता येत नाही तर शाळकरी मुलांचा शाळेचा प्रवास जीवघेणा झाला असल्याची बातमी साम टिव्हीने प्रसारित केली.

या बातमीची दखल घेत (saam impact) शहापूरात (shahapur) पाणी जमा झाल्याच्या ठिकाणी पोलिस व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी पोहोचले. सध्या येथे पर्यायी व्यवस्था करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या अमरावती दौऱ्यावर

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; 3 वेळा विजेतेपद मिळवून देणाऱ्या दिग्गजानं १० वर्षांनी दिला तडकाफडकी राजीनामा

Jelly Bangles Designs: जुन्या बांगड्यांना म्हणा अलविदा, यंदाच्या फेस्टिव्हलला ट्राय करा या स्टायलिश जेली बँगल्स

Party Wear Blouse: पार्टी वेअर साडीला मिळेल खास लूक! ब्लाउज हे 7 फॅन्सी डिझाइन्स नक्की ट्राय करा

Kanya Pujan 2026 : कन्या पूजनासाठी मुलींचं वय किती असावं? २ ते १० वर्षांच्या कन्यांच्या पूजेचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या

SCROLL FOR NEXT