Samruddhi Mahamarg Accident News  Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg News : समृद्धी महामार्गावर मोठा अपघात; ट्रक थेट पुलावरून खाली कोसळला, थरकाप उडवणारा VIDEO

केमिकलने भरलेला ट्रक अनियंत्रित होऊन थेट पुलावरून खाली कोसळला. पुलावरून कोसळताच ट्रकला भीषण आग लागली.

माधव सावरगावे, औरंगाबाद

Samruddhi Mahamarg Accident News : विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. समृद्धी महामार्गावर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास स्कॉर्पिओ कारचा भीषण अपघात झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा महामार्गावर केमिकलने भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे.  (Latest Marathi News)

समृद्धी महामार्गाला (Samruddhi Mahamarg) लागून असलेल्या छत्रपती संभाजीनगरजवळील फतियाबाद परिसरात केमिकलने भरलेला ट्रक अनियंत्रित होऊन थेट पुलावरून खाली कोसळला. पुलावरून कोसळताच ट्रकला भीषण आग लागली. आगीत केमिकलचा ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. या भयंकर घटनेत ट्रकमधील ड्रायव्हरसह सर्वांचा जळून मृत्यू झाल्याची माहिती आहे.

काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त (Accident) ट्रक शिर्डी येथून नागपूरच्या दिशेने केमिकल बॅरल घेऊन निघाला होता. ट्रक वेरूळ इंटरचेंजच्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या गोकुलवडी परिसरात आला असता समृद्धीच्या पूल जवळ कठडे नसल्याने रात्रीच्या वेळी चालकाला दिसले नाही.

त्यामुळे ट्रक पुलाच्या मधोमध असलेल्या पोकळी मधून थेट खाली कोसळला. पुलावरून कोसळताच ट्रकला भीषण आग लागली. या घटनेत ट्रकमधील चालकासह सर्व प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांसह अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, केमिकल ट्रक असल्यामुळे वेळेवर आग विझवण्यात अग्निशमनदलाला अपयश आलं.

ट्रक अपघातात नेमका किती जणांचा मृत्यू झाला याचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. दरम्यान, औरंगाबाद येथून महापालिकेच्या अग्निशमन वाहनाने आग आटोक्यात आणली. तीन दिवसात पुलावरून वाहन पडण्याची ही दुसरी घटना असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra News Live Update: Mumbai: पवई पोलिसांची अवैध डिझेल साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई.

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT