Samruddhi Mahamarg Accident News Saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident News: समृद्धीवर अपघात सत्र सुरूच; टायर फुटल्याने कारचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका संपता संपत नाही आहे. समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे .

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

Amravati Accident News: समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका संपता संपत नाही आहे. समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे . अमरावती जिल्ह्यातील शिवनी फाट्याजवळ कारचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिघे जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. नुकताच अमरावती जिल्ह्यातील शिवनी फाट्याजवळ कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. नागपूरकडून मुंबईकडे जात असताना हा अपघात झाला आहे. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिघे जखमी झाले आहे.

अपघातातील दोघे गंभीर जखमी असल्याने त्यांना तातडीचे रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या संदर्भात अधिक तपास पोलीस सध्या करत आहेत.

समृद्धी महामार्गावर वाढत्या अपघातामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. तर दुसरीकडे अपघात रोखण्यासाठी प्रशासन देखील सज्ज झालं आहे. समृद्धी महामार्गावर अनफीट टायर असलेल्या वाहनांचे तपासणी सुरू आहेत.

काल काही केलेल्या वाहन तपासणीत कारचे टायर पूर्णपणे वोर्न आऊट झालेले आढळून आले आहेत. त्या कारणामुळे सदर वाहनांना समृद्धीवरून परत पाठवण्यात येत आहेत. वाढत्या अपघातामुळे अनफीट टायर असलेल्या वाहनांना समृध्दी महामार्गावरून प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

याचदरम्यान, अमरावती जिल्ह्यातील शिवनी फाट्याजवळ कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिघे जखमी झाले आहेत.

छत्रपती संभाजीनगरकडे येताना भीषण अपघात

काही दिवसांपूर्वी देखील समृद्धी महा मार्गावर अपघात झाला होता. शिर्डीहून छत्रपती संभाजीनगरकडे येत असताना हा भीषण अपघात (Accident) झाला होता.

या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला होता. या जखमीला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT