Samruddhi Highway Accident Saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच; भीषण कार अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

नांदेडहून मुंबईकडे जाणाऱ्या कारचा अपघात झाल्याची घटना घडली. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

सचिन बनसोडे

Ahmednagar Accident News: समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. नांदेडहून मुंबईकडे जाणाऱ्या कारचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. नगरच्या कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात अपघात झाला आहे. या भीषण अपघातात तिघे जण जागीच ठार झाले आहेत. या मृतांमध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचा सामावेश आहे.

नांदेडहून मुंबईकडे जाताना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावाजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातानंतर अनेक जण जमा झाले. त्यांनी तातडीने पोलीस आणि रुग्णालयाला कळवलं. त्यानंतर रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहोचली.

नेमका अपघात कसा झाला?

समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. नांदेडहून मुंबईकडे जाताना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावाजवळ अपघात झाला आहे. समृद्धी महामार्गावर ही कार दुभाजकाला धडकली. त्यानंतर कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. तर या अपघाताने तिघांच्या मृत्यूने समृद्धी महामार्गावरील मृतांचा आकड्यात भर पडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

Early Morning Dreams: सकाळी पडणारे स्वप्न खरंच पूर्ण होतात का?

SCROLL FOR NEXT