Samruddhi Mahamarg Accident News  Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर अपघातात 12 जणांचा मृत्यू, ट्रक चालकासह 2 आरटीओ पोलिसांवर गुन्हा दाखल

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात 12 जणांचा मृत्यू, ट्रक चालकासह 2 आरटीओ पोलिसांवर गुन्हा दाखल

डॉ. माधव सावरगावे

Samruddhi Mahamarg Accident:

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातानंतर 12 लोकांच्या मृत्यूप्रकरणी अखेर वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरटीओचे दोन अधिकारी आणि ट्रक ड्रायव्हरच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

प्रदीप छबुराव राठोड आणि नितीनकुमार गणोरकर, असं आरटीओ अधिकारी यांचं नाव असून ते आरटीओ कार्यालयात सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. परिवहन विभागाच्या आयुक्तांनी या दोघांचं तात्काळ निलंबनही केलं आहे.

ट्रक चालक आणि दोनही आरटीओ अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलंय. अपघात होताच आरटीओ अधिकारी त्या ठिकाणाहून पळून गेले होते. नंतर त्यांनीच अपघात झाल्याचा फोनही केला असल्याची माहिती पोलिसांकडून मिळते आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, शनिवारी मध्यरात्री नाशिक येथील इंद्रानगर येथे राहणारे जवळपास 35 भाविक खाजगी टम्पो ट्रॅव्हल्सने बुलढाणा येथे बाबा सैलाणीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परत येत असताना समृद्धी महामार्गावर अगरसायगाव परिसरात हा भीषण अपघात झाला.

समृद्धी टोल नाक्यावर पोलिसांनी एक ट्रक थांबवण्यासाठी, बाजूला घेत होते, असं सांगण्यात येत आहे. त्याच वेळेस मागून आलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बसच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dearness Allowance: मोठी बातमी ! राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना होळीचं गिफ्ट; ८ लाख निवृत्ती वेतनधारकांनाही होणार मोठा आर्थिक फायदा

IND vs ZIM T20 WC: झिम्बाब्वेचा दारूण पराभव; भारत उपांत्य फेरीपासून एक पाऊल दूर; हार्दिक बनला विजयाचा हिरो

रश्मिका मंदाना अन् विजय देवरकोंडा अकडले लग्न बंधनात; कपलची एक कृती ठरली चर्चेचा विषय

Rajya Sabha Election: उद्धव ठाकरे राज्यसभेवर जाणार? मविआमध्ये पडद्यामागे काय घडतेय?

Zilla Parishad: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर सदस्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT