Nagpur-Mumbai Expressway Accident : समृद्धी महामार्गावरील अपघाताचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. आज पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर अपघात झालाय. मेहकरजवळ आयशर चालकाला पहाटे डुलकी लागली, त्याचं कारवरील नियंत्रण सुटले. झोपेमध्ये आयशर जाऊन समोर उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय.
मेहकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर आयशर आणि ट्रक यांच्यात धडक होऊन एक जण जागीच ठार झाला. पहाटे ५:३० वाजता हा भीषण अपघात झाला. पालघर येथून नागपूरकडे जाणाऱ्या आयशर वाहन चालकाला पहाटे डोळ्यावर झोप आली. चालकाला डुलकी लागल्यामुळे उभ्या ट्रकला पाठीमागून धडकला. या अपघातात आयशर चालक अमित कुमार यादव जागीच ठार झाला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांनी अपघाती मृत्यूची नोंद केली. त्याशिवाय वाहतूककोंडी दूर करत रस्ता मोकळा करून दिला.
समृद्धी महामार्गा अपघातांसाठी कुप्रसिद्ध झालाय. मुंबई ते नागपूर या महामार्गावर वाहतुकीचे प्रमाण अधिक असून, बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक अपघात होत असल्याचे आकड्यातून स्पष्ट झालेय. अपघाताला रोखण्यासाठी शासनाने काही उपाययोजना राबवल्या होत्या, पण अपघाताचे सत्र थांबत नाही. दररोजच समृद्धी महामार्गावर अपघात होत आहेत, आणि त्याचा केंद्रबिंदू म्हणून बुलढाणा जिल्हा ठरतो आहे.
समृद्धी महामार्गावर वाहने थांबविण्यास बंदी आहे, तरीदेखील अनेक वाहनचालक नियमांचे उल्लंघन करून येथे वाहने थांबवत आहेत. यामुळे वेगाने धावणारी वाहने थांबलेल्या वाहनांना धडकतात. यामुळे अपघात होत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातून ८७ किमी हा महामार्ग जातो, आणि या मार्गावर ठिकठिकाणी पेट्रोल पंप आहेत. या पेट्रोल पंपांच्या आसपास अनेक अनधिकृत हॉटेल्स उघडले गेले आहेत, जिथे बिनधास्त अवैध दारूविक्री सुरू आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. काही जण दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा आरोप होत आहे. आर.टी.ओ, पोलीस, व एम.एस.आर.डी. या विभागांच्या दुर्लक्षामुळे रोजच अपघातांची संख्या वाढत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.