Manoj jarange Patil Duplicate Saam Tv
महाराष्ट्र

Manoj jarange Patil Duplicate: तशीच संवादफेक..शरीरयष्टी, हेअरस्टाइल, सेम टू सेम; Video बघून म्हणाल, अरे हे तर डिट्टो मनोज जरांगे पाटील!

Manoj jarange Patil Duplicate: मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची ग्रामीण भाषेतील बोलण्याची ढब, मोकळेपणाने केलेली शब्दफेक, शरीरयष्टी किरकोळ पण मोठ्या केसांची स्टाईल आणि सॉलिड डेअरींग हे अनेकांना भावतंय. विशेषकरून तरुणांना जरांगे पाटलांचा रुबाबाची क्रेझ निर्माण झालीय. त्यात जरांगे पाटील यांचा एक डुप्लीकेट जरांगे पाटील यांचा व्हिडिओ व्हायल होतोय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गिरीश निकम, साम टीव्ही, मुंबई

Manoj jarange Patil Duplicate:

मराठा आरक्षणावरून राज्यभरात झंझावात निर्माण करणारे आंदोलक मनोज जरांगेंची तरुणांमध्ये एक क्रेझ निर्माण झालीय. जरांगे-पाटील आपल्या बोलण्याच्या स्टाईलने आणि सरकारला टक्कर देण्याच्या धाडसामुळे लोकप्रिय झालेत. राज्यभरात मनोज जरांगे-पाटील यांचीच चर्चा आहे, अशात त्यांच्यासारखा दिसणारा एक हुबेहुब मिनी जरांगेंचा व्हिडिओ व्हायरल होतोय. (Latest News)

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची ग्रामीण भाषेतील बोलण्याची ढब, मोकळेपणाने केलेली शब्दफेक, शरीरयष्टी किरकोळ पण मोठ्या केसांची स्टाईल आणि सॉलिड डेअरींग हे अनेकांना भावतंय. विशेषकरून तरुणांना जरांगे पाटलांचा रुबाबाची क्रेझ निर्माण झालीय. राज्यातील त्यांच्या प्रत्येक सभांना तुफान गर्दी होतेय. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासेमध्ये जरांगेंची सभा होती. मात्र या सभेआधी एका मिनी जरांगेंची चर्चा जोरात होतेय. कारणही तसंच होतं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हुबेहुब मनोज जरांगे-पाटलांसारखे दिसणारे हे महाशय आहेत रामेश्वर घोंगडे. ते नेवासे तालुक्यातील लेंगीशिरस गावातील रहिवासी आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या सारखंच रंगरुप, बोलणेही तसंच. कपाळावर टिळा, केसांची स्टाईलही मिळतीजुळती. गळ्यात भगवा गमछा मग काय चर्चा तर होणारच ना.

आता तुम्हाला वाटलं असेल हे रामेश्वरही मराठा आंदोलक असतील. तर नाही ते धनगर समाजाचे आहेत. मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आणि मनोज जरांगे-पाटील यांना भेटण्यासाठी ते नेवासेत सभेच्या ठिकाणी आले होते. त्यावेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्या संवाद साधला. मराठा आणि धनगरांना आरक्षण मिळेपर्यंत जरांगे पाटील यांनी लढा सुरूच ठेवावा, अशी मागणी रामेश्वर घोंगडे केलीय.

जरांगेंसारखं दिसत असल्यानं अनेक ठिकाणी दाद मिळते, प्रतिसाद मिळतो, असा अनुभव रामेश्वर यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितला. पंढरपुरमधला अनुभव तर थक्क करणारा होता. एका बागायतदाराने तर खूप आपुलकी, प्रेम दिलं दिल्याचं रामेश्वर यांनी आवर्जून सांगितंल. आत्तापर्यंत आलेले अनुभव आणि लोकांचं कसं प्रेम मिळतं आहे हे सांगताना रामेश्वर अगदी भारावून जातात.

गावाच्या मातीशी नाळ जुळलेले, गाडी चालवण्याचे काम करणा-या रामेश्वर यांच्या भोवतीही आता लोकांची गर्दी होतेय. जरांगेच्या प्रसिद्धीच्या वलयाचा त्यांनाही फायदा होत आहे. प्रसिद्ध सिने अभिनेत्यांचे ड्युप्लिकेट अनेक कार्यक्रमांमध्ये लोकांचं मनोरंजन करतात. नरेंद्र मोदींसारखे हुबेहुब दिसणारेही भाजपच्या प्रचारात हातभार लावतात. आता मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणावरुन रान उठवलं असताना रामेश्वर घोंगडेही लोकांचं आकर्षण झालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

Marathi bhasha Vijay Live Updates : राज ठाकरे-उद्धव ठाकरे मेळाव्यासाठी रवाना, थोड्याच वेळात तोफ धडाडणार

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT