Sambhajiraje Chhatrapati saam tv
महाराष्ट्र

Sambhajiraje Chhatrapati Viral Video : चर्चा तर हाेणारच! संभाजीराजेंना लागले मुख्यमंत्री हाेण्याचे वेध (पाहा व्हिडिओ)

यावेळी आंदाेलकांनी राजे आमची देखील हीच इच्छा आहे असे म्हटले.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

मला मुख्यमंत्री करा तुमचे प्रश्न तातडीने साेडविताे असे आश्वासन देत गेल्या 23 दिवसांपासून उपाेषणास बसलेल्या काेल्हापूरातील युवकांना दिवाळी सणात आंदाेलन करु नये असे आवाहन युवराज संभाजीराजे छत्रपती (yuvraj sambhajiraje chhatrapati) यांनी दिले. दरम्यान राजेंचा मला मुख्यमंत्री करा असे गंमतीने म्हटले असले तर संबंधित व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल (video viral in social media) हाेऊ लागली आहे. (Maharashtra News)

काेल्हापूरात (kolhapur) सारथीच्या विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्विकारला आहे. या आंदाेलनास युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी भेट दिली. या भेटीत राजेंनी विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि अडचणी समजावून घेतल्या. त्यावेळी विद्यार्थ्यांनी आमच्या मागण्या पूर्ण करा अशी विनंती राजेंना केली.

त्यावेळी संभाजीराजेंनी प्रश्न साेडविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे म्हटले. त्यानंतर आंदाेलकांनी त्यांच्याकडे मागण्यांच्या पाठपूराव्यासाठी आग्रह धरला. त्यावेळी राजेंनी मला मुख्यमंत्री करा तुमच्या मागण्या पूर्ण करतो, तुम्हांला उपोषणाला बसायला लागणार नाही असे हसत हसत म्हटले. त्यावेळी आंदाेलकांमध्येही हशा पिकला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी आंदाेलकांनी राजे आमची देखील हीच इच्छा आहे असे म्हटले. राजेंच्या वक्तव्याचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायर हाेऊ लागला आहे. संभाजीराजेंनाही आता मुख्यमंत्री होण्याचे वेध लागले आहेत का याची चर्चा सुरू आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

SCROLL FOR NEXT