Maharashtra Politics  Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत कलह! भाजपने केसानं गळा कापला, शिंदेसेनेच्या आमदाराचा आरोप

BJP vs Shinde Sena in Sambhajinagar ZP: छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपने शिंदेसेनेला सत्तेपासून बाजूला ठेवले. त्यामुळे शिंदेसेनेचे नेते आक्रमक झालेत.

Priya More

Summary -

  • संभाजीनगरमध्ये महायुतीत वाद उफाळला

  • शिंदेसेनेचा भाजपवर विश्वासघाताचा आरोप

  • संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये भाजपने स्वतंत्रपणे सत्ता स्थापन केली

  • शिंदेसेनेचे नेते आक्रमक झाले असून त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले

माधव सावरगावे, संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेवरून भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षांमध्ये वाद पेटलाय. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी चर्चेत दूर ठेवून आमचा भाजपने विश्वासघात केला आणि केसांने गळा कापला असा आरोप शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आले आहे. संभाजीनगरमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपने खेळी करत शिवसेना शिंदेगटाला सत्तेपासून दूर ठेवलं. जिलाह परिषदेवर भाजपचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सर्वाधिक २३ जागा भाजपने जिंकल्या होत्या. त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे पक्षाने २१ जागा जिंकल्या. या दोघांची युती राज्यात असल्यामुळे नैसर्गिकरित्या जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी युती होईल अशी चर्चा सुरू होती. दोन्ही पक्षाच्या राज्य पातळीवर आणि स्थानिक पातळीवरच्या नेत्यांच्या बैठका झाल्या. बैठकीमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष त्यासोबतच वेगवेगळ्या विभागाची सभापतीपद कुणाच्या वाट्याला किती येतील याचीही चर्चा झाली. विशेष म्हणजे आज दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत शिवसेना शिंदेगटाला भाजपने ताटकळत ठेवले असल्याचं शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार विलास भुमरे यांनी सांगितले.

भाजपने शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे चार, प्रहारचा एक अपक्ष आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे दोन सदस्य फोडून सत्ता स्थापन केली. मात्र याची साधी कुनकूनही शिवसेना शिंदेसेनेच्या स्थानिक नेत्यांना लागू दिली नाही. त्यामुळे शिवसेना शिंदेगटाचे स्थानिक आमदार अब्दुल सत्तार आणि विलास भुमरे हे चांगले संतापले.

जिल्हा परिषदेवर भाजपचे अविनाश गलांडे हे अध्यक्ष तर जितेंद्र जयस्वाल हे उपाध्यक्ष झाले. ६३ सदस्यांपैकी ३२ सदस्य उपस्थित राहिले. ३१ सदस्य सभागृहात आलेच नाहीत. या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे पक्षाने बहिष्कार टाकला आणि एकही सदस्य सभागृहामध्ये निवडणुकीसाठी गेला नाही. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे एकही सदस्य सभागृहात गेला नाही. त्यामुळं भाजपच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली.

यावर भाजपचे नेते आणि मंत्री अतुल सावे यांनी आम्ही नाही तर शिवसेनेनेच दगाबाजी केली असल्याचं सांगितले. अध्यक्षपदावर सर्व ठरले. मात्र शेवटच्या दोन दिवसांत शिवसेना स्वतंत्र सत्ता स्थापना करण्यासाठी हालचाली सुरू करीत असल्याचा आमच्या लक्षात आल्या आणि त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने हे सत्ता स्थापन केले असेही सावे म्हणाले. तर, दोन्हीकडचे नेते एकमेकांकडे आता बोट दाखवत आहेत. मात्र शिंदेसेनेच्या आमदारांनी याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील असा थेट इशारा दिला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप शिवसेनेमध्ये वाद तर सुरू झालेत. सोबतच शिवसेनेने आता थेट राज्य पातळीवरच भाजपला अंगावर घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suraj Chavan: लग्नाच्या तीन महिन्यातच सुरज चव्हाणच्या घरी हलणार पाळणा? संजनाच्या पोस्टमुळे रंगली चर्चा

Maharashtra Live News Update: नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात अवकाळी पाऊस; पिकांना फटका

महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपलं; शेतकरी हवालदिल, पुढील ४८ तासांत २४ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

4-लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिनची ताकद, 4.1 सेकंदात 100 km/h वेग...; Audi SQ8 ची भारतात दमदार एंट्री, वाचा वैशिष्ट्ये

Breakfast Recipe : तांदूळ अन् उकडलेले बटाटे; १० मिनिटांत बनवा 'ही' कुरकुरीत रेसिपी, संध्याकाळी होईल पोटभर नाश्ता

SCROLL FOR NEXT