Sambhajinagar ZP School Teacher Student News  AI Image
महाराष्ट्र

Shocking : विद्यार्थ्याने गणिताचा प्रश्न सोडवला नाही, संतापलेल्या शिक्षकाने बेदम मारलं; संभाजीनगरमधील घटना

Sambhajinagar Vaijapur ZP School News : वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत गणिताचा प्रश्न सोडवता आला नाही म्हणून चौथीच्या विद्यार्थ्याला काठीने मारहाण केल्याचा शिक्षकावर आरोप. पालकांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल.

Alisha Khedekar

  • गणिताचा प्रश्न सोडवता आला नाही म्हणून चौथीच्या विद्यार्थ्याला मारहाण

  • शिक्षकाने काठीने मारल्याने विद्यार्थ्याच्या तोंडावर आणि पोटरीवर वळ

  • मुलाच्या वडिलांनी वैजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली

गणिताचा प्रश्न सोडवता आला नाही म्हणून चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्याला शिक्षकाने काठीने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सदर प्रकार संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील मकरमतपूरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत घडल्याचा आरोप आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित शिक्षकाविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मकरमतपूरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला गणिताचा प्रश्न सोडवता आला नाही. यावेळी शिक्षक राजू डुकरे यांनी विद्यार्थ्याला काठीने मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या मारहाणीत विद्यार्थ्याच्या तोंडावर तसेच पोटरीवर वळ उमटल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी रडत घरी आला. घरी आल्यानंतर त्याने आई-वडिलांना शाळेत घडलेला प्रकार सांगितला. मुलाच्या अंगावर मारहाणीच्या खुणा दिसून आल्यानंतर पालकांनी शिक्षकाकडे याबाबत विचारणा केली. विद्यार्थ्याच्या वडिलांनी शिक्षकाला फोन करून मुलाला मारहाण करण्याचे कारण विचारले. त्यावेळी शिक्षकाने ‘एकदाच मारले’ असे सांगून फोन कट केल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या वडिलांनी केला आहे.

यानंतर विद्यार्थ्याच्या वडिलांनी वैजापूर पोलीस ठाण्यात धाव घेत शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शिक्षक राजू डुकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार किसन गवळी करत आहेत. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि शाळांमधील शिस्तीच्या पद्धतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांकडून झालेल्या चुका समजावून सांगण्याऐवजी शारीरिक शिक्षा केली जात असल्यास त्यावर संबंधित यंत्रणेने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून तपासाअंती पुढील कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT