Sambhajinagar Mondha Naka Flyover Road Accident Saam Tv
महाराष्ट्र

Accident : संभाजीनगरमध्ये कार- रिक्षाचा भीषण अपघात; दोघांनी जागीच सोडले प्राण; गरोदर महिला गंभीर तर बाळाचा पोटात मृत्यू

Sambhajinagar Mondha Naka Flyover Road Accident : संभाजीनगरमधील मोंढा नाका उड्डाणपुलावर भरधाव कारने रिक्षाला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून गर्भवती महिलेच्या पोटातील सात महिन्यांचे बाळही दगावले आहे. कारचालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

Alisha Khedekar

  • संभाजीनगरच्या मोंढा नाका उड्डाणपुलावर भीषण अपघात

  • रिक्षाला भरधाव कारची धडक; तिघांचा मृत्यू

  • गर्भवती महिलेच्या पोटातील सात महिन्यांचे बाळ दगावले

  • कारचालक अटकेत, पोलिसांकडून पुढील तपास सुरू

संभाजीनगरमध्ये भीषण अपघात झाला आहे. शहरातील मोंढा नाका उड्डाणपुलावर शनिवारी मध्यरात्री भरधाव आलिशान कारने रिक्षाला पाठीमागून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, या धडकेत तिघांचा मृत्यू झाला असून धक्कादायक म्हणजे या रिक्षात बसलेल्या एका गर्भवती महिलेचं ७ महिन्यांचं बाळ दगावलं आहे. या अपघातानंतर कार चालक फरार होता, मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत कार चालकाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल्ला अबित अब्दुल्ला मुजीब याने जवाहरनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी रात्री ९:१५ वाजता तो स्वतः त्याची मावशी अजराबानू जेधपूरवाला, मावशीचा मुलगा अख्तर रजा, अहमद रजा, मुली उजमा बानो व जेबा बानो, सून अलिझा आणि नात जोहरा यांच्यासह इतर तीन बालके असे सर्वजण सिडकोतील कामगार चौकाजवळील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवणानंतर अहमद रजा आणि त्याची बहीण जेबा बानो हे दोघे स्कूटीवर, तर उर्वरित सर्व जण मोहंमद बारी यांच्या रिक्षाने जुना बाजार, सिटी चौकातील त्यांच्या घरी निघाले. अहमद रजा यांची स्कुटी पुढे, तर पाठीमागे रिक्षा होती. मोंढा नाका उड्डाणपुलावरून जाताना मागून आलेल्या सुसाट कारने रिक्षाला जोरदार धडक दिली.

या धडकेने, रिक्षातील अख्तर रजा हा उंच उडून उड्डाणपुलावरून थेट खाली रस्त्यावर कोसळला. स्कुटीवरील अहमद रजा यांनी तत्काळ खाली जाऊन अख्तरला रुग्णालयात दाखल केले. अन्य नागरिकांनी मदत करून रुग्णवाहिका बोलावून जखमींनाही एमजीएममध्ये दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून अख्तर आणि जोहरा यांना मृत घोषित केले, तर अलिझा ही सात महिन्यांची गर्भवती होती. तिच्या पोटातील बाळही या अपघातात दगावले आहे. रिक्षाचालकासह इतर सर्व जण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान रिक्षाला धडक देणारा चालक कश्यप विनोद पटेल (वय ३३, रा. कुशलनगर) याचा जवाहरनगर पोलिसांनी तत्काळ शोध घेऊन अटक केली. कश्यप पटेल हा प्लाऊडचा व्यवसाय करतो. अपघातानंतर त्याने जखमींना मदत करण्याऐवजी गाडीतील तीन मुलींसह पळ काढला. यानंतर पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर २३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक मारोती खिल्लारे करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : तुमचा जवळचा मित्र विश्वासघात करण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना जपून निर्णय घ्यावा लागेल

दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटीक्स; शिंदेंचा ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल|VIDEO

CM फडणवीसांकडून 'लाव रे तो व्हिडिओ' पॅटर्न; शिवतीर्थावरून ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल, VIDEO

मलाईवरुन मुंबई तापली, मुंबईत येतो, पाय छाटून दाखवा

ऐन निवडणुकीत महायुती सरकारला मोठा धक्का; लाडकी बहीण योजनेचे पैसे रखडले, कारण काय?

SCROLL FOR NEXT