आता एक धक्कादायक बातमी छत्रपती संभाजीनगरातून समोर येत आहे. समलैंगिक डेटिंग ॲपचा वापर करून उच्चशिक्षित तरुणांची मैत्रीच्या नावाखाली लुटमार करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांना या टोळीसंदर्भात माहिती मिळताच त्यांनी तपास करून ३ आरोपींना अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आधी समलैंगिक डेटिंग अॅप तयार केले. त्यात बनावट प्रोफाईल तयार केले. या प्रोफाईलच्या आधारे त्यांनी आतापर्यंत १० ते १५ तरूणांना जाळ्यात ओढलं आहे. तिघांची ही टोळी आधी तरूणांशी आधी मैत्री करायचे. नंतर मैत्री करून भेटायला बोलवायचे.
मात्र, प्रत्यक्ष भेटीच्या वेळी तरुणांना "तू समलैंगिक आहेस, तुझा व्हिडिओ व्हायरल करतो" अशी धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे आणि मौल्यवान वस्तू लुटायचे. जर कुणी ऐकत नसेल तर, त्या तरूणांवर शारीरिक मारहाण करण्यात आली आहे. याच पद्धतीने त्यांनी आतापर्यंत त्यांनी १० ते १५ तरूणांना फसवले असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून शिवम सुरेश पवार, राहुल राजू खांडेकर आणि आयुष संजय लाटे या तिघा आरोपींना अटक केली आहे. पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी सुरू असून, अशाच प्रकारे फसवले गेलेले आणखी तरुण पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे संभाजीनगरमध्ये खळबळ माजली आहे. तरुणांनी डेटिंग ॲप्स वापरताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
जळगावात बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम
जळगाव जिल्ह्यात सतत बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांची संख्या तब्बल १० टक्क्यांनी वाढली आहे. विशेषतः ताप, सर्दी, खोकला आणि श्वसनासंबंधी आजारांनी ग्रस्त रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा, विशेषतः पाणी भरपूर पिण्याचा, योग्य आहार घेण्याचा आणि हवामानाच्या बदलानुसार कपड्यांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.