Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : खळबळजनक! बदलापूरमधील 'त्याच' शाळेतील विद्यार्थिनी घर सोडून गेली; थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये सापडली

Sambhajinagar News : बदलापूर येथील १५ वर्षीय मुलगी रेल्वेने शुक्रवारी रात्री २ वाजता रेल्वे स्थानकावर उतरली. रेस्ट रूममध्ये थांबली. शनिवार सायंकाळी स्थानकाबाहेर पडली.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : बदलापूरची घटना सध्या सर्वत्र गाजत आहे. याच बदलापूरमधून पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावत्र वडिलांच्या त्रासाला कंटाळून बदलापूरची १५ वर्षांची मुलगी घर सोडून बाहेर पडली. ती थेट संभाजीनगरमध्ये पोहचली. रात्रभर रेल्वे स्टेशनवर राहिल्यानंतर सकाळी या मुलीला दामिनी पथकाने ताब्यात घेतले आहे. 

बदलापूर येथील १५ वर्षीय मुलगी रेल्वेने शुक्रवारी रात्री २ वाजता रेल्वे स्थानकावर उतरली. रेस्ट रूममध्ये थांबली. शनिवार सायंकाळी (Sambhajinagar) स्थानकाबाहेर पडली. तोपर्यंत तिच्या आईने बदलापूर पोलिसांकडे धाव घेतली होती. नेहाने मोबाइल सुरू करताच बदलापूर पोलिसांच्या तांत्रिक तपासात नेहा महावीर चौक परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. बदलापूर पोलिसांकडून दामिनी पथकाला तिची माहिती देण्यात आली. यानंतर दामिनी पथकाने लगेच धाव घेत तिला सुखरूप ताब्यात घेतले. दामिनी पथकातील अंमलदार निर्मला निभोरे, रुपाली शिंदे यांनी बाबा चौकात धाव घेत तिची विचारपूस करत तिला ताब्यात घेतले आहे. 

बदलापूर (Badlapur) अत्याचार प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या 'त्या' शाळेचीच ती विद्यार्थिनी आहे. त्या शाळेतून तिने नुकतेच दहावी उत्तीर्ण केली आहे. १५ वर्षीय मुलीच्या आईने दुसरे लग्न केले. सावत्र वडील तिला त्रास देत होते. यामुळे कंटाळून ती गुरुवारी रात्री मोबाइल बंद करून घर सोडून निघून आली. दामिनी पथकाच्या निंभोरे यांनी तिला स्वतःची ओळख दिली. विश्वासात घेतल्यानंतर तिने सर्व प्रकार कथन केला. महिला पोलिसांनी कुटुंबाला संपर्क केल्यानंतर तिची आई रात्री इकडे निघाली. तिच्या जेवण, राहण्याची व्यवस्था पोलिस करत असल्याचे पाहून मुलीला अश्रू अनावर झाले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT