Nandurbar Politics : भाजप नेते पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर; माजी मंत्री वळवी निवडणूक लढवण्याच्या तयारीत

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील पद्माकर वळवी यांची आदिवासी चेहरा म्हणून ओळख आहे. वळवी यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : आदिवासी चेहरा म्हणून ओळख असलेल्या आणि काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले माजी मंत्री पद्माकर वळवी आता पुन्हा पक्ष बदलण्याची शक्यता आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वळवी हे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. त्या अनुषंगाने त्यांचे प्रयत्न देखील सुरु आहेत. 

नंदुरबार (Nandurbar News) जिल्ह्यातील पद्माकर वळवी यांची आदिवासी चेहरा म्हणून ओळख आहे. वळवी यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु एखाद्या पक्षाने मला तिकीट दिले, तर मी त्या पक्षातून निवडणूक लढणार असल्याचे संकेत पद्माकर वळवी यांनी दिले आहेत. मला चांगली संधी मिळाली तर ते संधीच्या मी फायदा घेणार. यामुळे पद्माकर वळवी हे पुन्हा काँग्रेसमध्ये (Congress) जाण्याची शक्यता आहे. 

Nandurbar News
Nandurbar News : परतीच्या पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यात १५०० हेक्टरवरील पिकांना फटका; मिरची, केळी, सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान

दोन मतदार संघातून लढण्याची इच्छा 

गेल्या अनेक दिवसापासून पद्माकर वळवी हे मुख्यमंत्री आणि सरकारच्या विरोधात वक्तव्य करत आहेत. परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शहादा- तळोदा मतदार संघ किंवा अक्कलकुवा- अक्राणी या मतदार संघातून लढण्याची इच्छा पद्माकर वळवी यांनी व्यक्त केली आहे. मात्र येणाऱ्या काळात कोणता पक्ष वळवी याना तिकीट देणार त्यानुसार पुढचे राजकीय समीकरण जमणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com